Dr. Satish Upalkar’s article about Vertigo and Sweating causes in Marathi.

चक्कर येणे व घाम येणे –

अनेक कारणांनी चक्कर येऊ शकते. चक्कर येते तेंव्हा आजूबाजूच्या वस्तू भोवताली फिरत असल्यासारखे वाटते. चक्कर येते तेंव्हा त्याबरोबरच अन्य काही डोकेदुखी, मळमळ अशी लक्षणेही जाणवू लागतात. अशावेळी घामही येत असतो. चक्कर येऊन घाम येणे याची कारणे व उपचार याविषयी माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे.

चक्कर येऊन घाम येण्याची कारणे –

अनेक कारणांमुळे चक्कर व घाम येऊ शकतो. याची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

हे सुध्दा वाचा – हायपरथायरॉईडीझम विषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक आहे ..?

चक्कर येऊन अत्यधिक घाम आल्यास खालील लक्षणे जाणवल्यास तातडीने डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.

  • छातीत दुखणे,
  • छातीच्या मध्यभागी दाब दिल्यासारखे वाटणे,
  • डावा जबडा, खांदा किंवा डाव्या हाताकडे वेदना होणे,
  • श्वास घेण्यास त्रास होणे,
  • हृदयाचे ठोके वाढणे,
  • तीव्र डोकेदुखी,
  • खूप उलट्या होणे,
  • हातापायात किंवा चेहऱ्याला मुंग्या येणे,
  • चेहरा किंवा हातापायात लुळेपणा जाणवणे,
  • अडखळत बोलणे,
  • ‎वस्तूच्या दोन-दोन प्रतिमा दिसणे (Double vision – diplopia),
  • ‎डोळ्यांनी अंधुक अस्पष्ट दिसणे,
  • कमी ‎ऐकू येणे,
  • ‎चालण्यास असमर्थ असणे,
  • तोल जाऊन पडणे,
  • ‎रुग्ण अधिक काळ बेशुद्ध असणे,

ही लक्षणे दिसून येत असल्यास रुग्णास तातडीने दवाखान्यात घेऊन जावे किंवा 108 ह्या क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घ्यावी. अशावेळी कोणतेही घरगुती उपाय करीत वेळ वाया घालवू नये.

हे सुध्दा वाचा – लकवा मारणे याची कारणे, लक्षणे व उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

चक्कर व घाम येणे यावरील उपचार –

कोणत्या कारणांमुळे चक्कर व घाम येत आहे यानुसार यावर उपचार ठरतात. यासाठी डोळे व कानांची तपासणी केली जाते. तसेच रक्तदाब, ब्लडशुगर तपासले जाईल.

चक्कर व घाम येणे हे ह्रदयासंबंधित आहे का ते पाहण्यासाठी Electrocardiogram (ECG) तपासणी केली जाईल. तसेच मेंदूसंबंधित कारणामुळे चक्कर येत आहे का ते पाहण्यासाठी एक्स-रे, CT स्कॅन, MRI स्कॅन अशा तपासण्या करण्याची आवश्यकता भासू शकते.

Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुध्दा वाचा – हार्ट अटॅकची कारणे, लक्षणे व उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

3 Sources

Image source – Pexels.com

Information about Vertigo and Sweating causes in Marathi language. Article written by Dr Satish Upalkar.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...