डोके गरम होणे – Head Feels Hot :

काहीवेळा आपले डोके गरम झाल्यासारखे वाटत असते. अशावेळी ताप न येताही डोके गरम झाल्यासारखे होते. ही एक अगदी सामान्य अशी समस्या असून आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीत बदल केल्यास या त्रासापासून दूर राहता येते. डोके गरम होण्याची कारणे व त्यावरील उपाय याविषयी माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे.

डोके गरम होणे याची कारणे व घरगुती उपाय यांची माहिती

डोके गरम होण्याची कारणे –

डोके गरम होण्याची अनेक कारणे अनेक असू शकतात.

  • विशिष्ट आहार खाण्यामुळे म्हणजे जास्त तिखट, मसालेदार पदार्थ, जास्त गरम पदार्थ खाण्यामुळे,
  • चहा, कॉफी, सोडायुक्त कोल्ड्रिंक्स अधिक पिण्यामुळे
  • उष्ण वातावरणामुळे,
  • उन्हात फिरल्याने किंवा उष्ण ठिकाणी काम केल्याने,
  • शरीरात डिहाइड्रेशन झाल्यामुळे,
  • शरीराची ऑक्सीजन लेव्हल कमी झाल्याने,
  • थायरॉईड समस्येमुळे हायपरथायरॉईडीझमचा त्रास असल्यास डोके गरम होऊ शकते.
  • हार्मोन्समधील असंतुलनामुळे, विशेषतः रजोनिवृत्ती नंतर काही महिलांमध्ये डोके गरम होण्याची तक्रार होऊ शकते.
  • जास्त व्यायाम केल्याने,
  • अतिमद्यपान,
  • मानसिक ताणतणाव,
  • अतिराग,
  • डायबेटिस किंवा हाय ब्लड प्रेशरचा त्रास असणे,

अशा विविध कारणांमुळे डोके गरम होऊ शकते.

जाणवणारी लक्षणे –

डोके गरम होणे या बरोबरच अस्वस्थ वाटणे, बैचेन वाटणे, काहीवेळा डोके दुखणे, छातीत धडधड होणे, अधिक तहान लागणे यासारखी लक्षणे यामध्ये जाणवू शकतात.

डोके गरम होणे यावर उपाय –

  • डोके गरम होत असल्यास डोक्याला खोबरेल तेल किंवा भृंगराज तेलाने मालिश करावी.
  • थंड पाण्याची पट्टी डोक्यावर ठेवावी.
  • डोके गरम होत असल्यास चंदन उगाळून त्याचा लेप कपाळाला लावावा. चंदनामध्ये शीतलता देणारे आयुर्वेदिक गुणधर्म असतात.
  • शहाळ्याचे पाणी प्यावे, फळांचा ताजा ज्यूस प्यावा.
  • नाकात गाईच्या तुपाचे 2-2 ड्रॉप्स घालावेत.

वरील घरगुती उपाय हे डोके गरम होणे यावर खूप उपयोगी पडतात.

डोके गरम होणे यावरील उपचार –

डोके नेमके कशामुळे गरम होत आहे त्या कारणांनुसार उपचार अवलंबून असतात. जर मायग्रेन किंवा डोकेदुखी यामुळे डोके गरम होत असल्यास यावरील औषध उपचार केले जातात. डिहाइड्रेशनमुळे डोके गरम होत असल्यास इलेक्ट्रॉलाइट दिले जाईल. काहीवेळा ग्लूकोजही चढवले जाईल.

डोके गरम होऊ नये यासाठी घ्यायची काळजी –

  • संतुलित आहार घ्यावा. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, ताजी फळे यांचा समावेश करावा.
  • दिवसभरात 7 ते 8 ग्लास पाणी प्यावे.
  • जास्त तिखट, मसालेदार पदार्थ, जास्त गरम पदार्थ खाणे टाळा.
  • वारंवार चहा, कॉफी पिणे टाळा.
  • सोडायुक्त कोल्ड्रिंक्स, अल्कोहोल, स्मोकिंग यापासून दूर राहा.
  • नियमित व्यायाम करा. पण जास्त व्यायाम करणे टाळा.
  • मोकळ्या हवेत फिरायला जावे.
  • प्राणायाम किंवा दीर्घ श्वास घेण्याचा व्यायाम करा. यामुळे शरीरातील ऑक्सीजन लेव्हल योग्य होईल.
  • मानसिक तणावापासून दूर राहा.
  • पुरेशी झोप घ्यावी.
Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुध्दा वाचा – डोकेदुखीची माहिती व उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

2 Sources

Information about Head feels hot causes and treatments in Marathi language. Article written by Dr Satish Upalkar.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...