व्हेरिकोज व्हेन्स –
व्हेरिकोज व्हेन्स मध्ये अशुद्ध रक्तवाहिन्यात रक्त जमा होऊन शिरा फुगतात. यामुळे शिरांना सूज येते व त्या दुखू लागतात. पायाच्या शिरांमध्ये व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास अधिक दिसून येतो.
व्हेरिकोज व्हेन्सची कारणे –
- कुटुंबात व्हेरिकोज व्हेन्सची अनुवांशिकता असणे,
- गरोदरपण,
- लठ्ठपणा,
- व्यायामाचा अभाव,
- सिगारेट-धूम्रपान सारखी व्यसने,
- उंच टाचेच्या चप्पल वापरणे,
- आहारात मिठाचे जास्त प्रमाण असणे,
- बराच काळ उभे किंवा बसून रहाण्याची सवय असणे
,
अशा विविध कारणांमुळे व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होऊ शकतो.
व्हेरिकोज व्हेन्सची लक्षणे –
- त्वचेवर जांभळट किंवा निळ्या रंगाच्या फुगीर शिरा दिसू लागतात,
- अशुद्ध रक्त साठून शिरा फुगतात.
- शिरांना सूज येते,
- त्या शिरा दुखू लागतात,
- शिरांच्या ठिकाणी खाज सुटते,
- पायाच्या शिरा सुजल्यास त्यामुळे पाय दुखू लागतो.
असे त्रास व्हेरिकोज व्हेन्समुळे होतात.
व्हेरिकोज व्हेन्स वर हे घरगुती उपाय करावे –
1) दुधात लसूण घालून प्यावे.
एक कप दुधात 3 लसूण कळ्या घालून दूध उकळून प्यावे. हा घरगुती उपाय नियमितपणे केल्याने शिरांचे अडथळे दूर होऊन व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास कमी होतो.
2) दुधात हळद घालून प्यावे.
काही दिवस एक ग्लास दुधात 1 चमचा हळद आणि थोडासा मध घालून ते दूध प्यावे. या उपायाने शिरांचे अडथळे दूर होऊन व्हेरीकोज व्हेन्सची समस्या दूर होते.
3) डाळिंबाचा रस प्यावा.
ग्लासभर डाळिंबाचा रस नियमितपणे काही दिवस सेवन करावा. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होते. व्हेरिकोज व्हेन्स घालवण्यासाठी हा घरगुती उपाय फायदेशीर आहे.
4) ऑलिव्ह ऑईलने मालीश करावी.
व्हेरिकोज व्हेन्स वर ऑलिव्ह ऑईलने मालीश करणे हा उपाय खूप फायदेशीर असतो. यामुळे शिरांतील अडथळा दूर होतो, त्याठिकाणी रक्ताभिसरण व्यवस्थित होते. तसेच मालीश केल्याने शिरांना आलेली सूज कमी होऊन वेदना दूर होण्यास मदत होते.
5) व्हेरिकोज व्हेन्स वर झेंडूची फुले चोळावीत.
व्हेरिकोज व्हेन्स वर झेंडूची फुले चोळल्याने हा त्रास कमी होण्यास मदत होतात.
वरील घरगुती उपाय व्हेरिकोज व्हेन्सच्या त्रासावर उपयोगी असतात.
वेरिकोज व्हेन्स असल्यास घ्यायची काळजी –
- वजन आटोक्यात ठेवा.
- नियमित व्यायाम करा. रोज फिरायला जावे, मॉर्निंग वॉक, योगासने करा. यामुळे पायांच्या शिरा मजबूत होतील.
- पायांचा स्ट्रेचिंग एक्सरसाइज करा.
- एकाचं जागी जास्त वेळ उभे किंवा बसणे टाळा.
- झोपताना पायाखाली उशी ठेवावीत. त्यामुळे पायाकडे रक्त न थांबता ते हृदयाकडे जाण्यास मदत होते.
- सिगारेट, धूम्रपान, मद्यपान अशा व्यसनांपासून दूर राहा.
- आहारातील मिठाचे प्रमाण कमी करा.
- उंच टाचा असणाऱ्या चपला घालू नका.
हे सुध्दा वाचा – व्हेरिकोज वेन्सवरील उपचार जाणून घ्या.
Read Marathi language article about Varicose veins causes and home remedies. Last Medically Reviewed on February 23, 2024 By Dr. Satish Upalkar.