Dr Satish Upalkar’s article about Uric acid increased causes in Marathi.
शरीरात युरिक ऍसिड वाढणे :
जेव्हा शरीरात यूरिक ऍसिड जास्त प्रमाणात तयार होते किंवा शरीरातील यूरिक एसिड पुरेशा प्रमाणात बाहेर पडत नाही तेव्हा रक्तामध्ये युरिक एसिडचे प्रमाण अधिक वाढते. याला hyperuricemia असेही म्हणतात. या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी युरिक ऍसिड वाढण्याची कारणे, लक्षणे व त्यावरील उपाय याविषयी माहिती सांगितली आहे.
युरिक ऍसिड वाढण्याची कारणे –
रक्तामध्ये युरिक एसिडचे प्रमाण अधिक वाढल्यास त्यामुळे सांध्यांच्या ठिकाणी युरिक ऍसिड जमा होऊन तेथे सूज व अतिशय वेदना होत असतात. या त्रासाला Gout असे म्हणतात.
युरिक ऍसिड वाढण्याची कारणे –
रक्तात यूरिक ऍसिडचे प्रमाण वाढण्यास जबाबदार असणारी प्यूरिन संयुगे (purine) ही आपल्या शरीरात नैसर्गिकपणे तयार होत असतात तसेच हाय प्यूरिनयुक्त पदार्थ अधिक खाल्यामुळेही शरीरात यूरिक एसिडचे प्रमाण वाढत असते.
हाय-प्युरिनयुक्त पदार्थ म्हणजे दारू-बियर, मासे, सीफूड, कोळंबी, झिंगा, खेकडे, मांसाहारी पदार्थ, कोल्ड्रिंक्स, चरबीचे पदार्थ, मटार, बेकरी प्रोडक्ट या पदार्थात प्युरिनचे अधिक प्रमाण असते. असे प्यूरिनयुक्त पदार्थ अधिक खाल्यामुळे शरीरात यूरिक एसिडचे प्रमाण वाढत असते.
युरिक ऍसिडवरील उपाय :
पुरेसे पाणी प्यावे..
युरिक ऍसिडचा त्रास असल्यास दिवसभरात पुरेसे म्हणजे साधारण 8 ग्लास पाणी प्यावे. यामुळे शरीरात वाढलेले अतिरिक्त युरिक ऍसिड लघवीवाटे शरीराबाहेर निघून जाण्यास मदत होते.
लसूण..
रक्तात वाढलेले युरिक ऍसिड कमी करण्यासाठी लसूण खूप उपयोगी पडते. यासाठी काही लसूण पाकळ्या चावून खाव्यात. तसेच लसूण पाकळ्या बारीक वाटून त्याचा लेप दुखणाऱ्या सांध्यावर लावणेही फायदेशीर ठरते.
आले..
आले खाण्यामुळे युरिक ऍसिडचे प्रमाण कमी होऊन सांध्यांना आलेली सूज कमी व वेदना कमी होतात. त्यामुळे या त्रासात आले खूप उपयुक्त ठरते. आल्यापासून बनवलेली सुंठही आपण खाऊ शकता. तसेच आले बारीक वाटून त्याचा लेप दुखणाऱ्या सांध्यांवर दररोज एकदा लावावा.
हळद..
हळदीत असणाऱ्या करक्यूमिन ह्या अँटी-ऑक्सिडंटमुळे सूज कमी होण्यास मदत होते. दोन कप पाण्यात अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा आल्याचा रस मिसळून मिश्रण 10 मिनिटे गरम करावे. हे मिश्रण थंड झाल्यावर प्यावे.
कोरपडीचा गर..
वेदना होणाऱ्या संध्याच्याठिकाणी कोरपडीचा गर (एलोविरा जेल) लावावा. यामुळे वेदना कमी होण्यास मदत होईल.
एरंडेल तेलाचा मसाज..
युरिक ऍसिडमुळे दुखणाऱ्या संध्याच्याठिकाणी कोमट केलेले एरंडेल तेल लावून हलका मसाज करावा. यामुळेही संध्यातील सूज, वेदना कमी होऊन आराम मिळेल.
a href=”https://healthmarathi.com/gout/”>युरिक ऍसिडमुळे होणाऱ्या गाउट ह्या आजाराविषयी माहिती जाणून घ्या..
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
In this article information about high Uric acid Causes, Symptoms and solutions in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).