मांडीची चरबी कमी करणे –
बैठी जीवनशैली, चुकीचा आहार खाणे, हार्मोन्समधील असंतुलन, आनुवंशिकता अशा विविध कारणांमुळे शरीरात अनावश्यक चरबी वाढते. सामान्यतः आपले शरीर हे आपल्या शरीरातील चरबी ही शरीराच्या विविध भागात समान रीतीने वितरीत करून संतुलन राखत असते. मात्र चरबीचे प्रमाण अधिक वाढल्यास या यंत्रणेवर परिणाम होतो. अशावेळी जीन्समुळे शरीरातील विशिष्ट भागात चरबी अधिक जमा होऊ लागते. याच कारणाने काहीजणांच्या मांडीत अधिक चरबी जमा झाल्याचे दिसून येते.
मांडीची चरबी कमी करण्यासाठी उपाय –
1) मांडीची चरबी कमी करण्यासाठी एरोबिक एक्सरसाइज करा ..
मांडीची चरबी कमी करण्यासाठी एरोबिक एक्सरसाइज करणे खूप फायदेशीर ठरते. यासाठी दररोज किमान अर्धा तास एरोबिक प्रकारचा एक्सरसाइज केला पाहिजे. यासाठी मोकळ्या हवेत चालण्यास जावे, सायकलिंग, पोहणे, झुंबा डान्स यासारखे एरोबिक एक्सरसाइज करावेत. या एक्सरसाइजमधून जास्तीत जास्त कॅलरी बर्न होऊन मांडीची चरबी कमी होण्यासाठी मदत होते.
2) मांडीची चरबी कमी करण्यासाठी सायकलने एक्सरसाइज करा ..
मांडीची चरबी कमी करण्यासाठी सायकलिंग खूप उपयोगी पडते. सायकल चालवल्याने मांडीच्या स्नायूंचा एक्सरसाइज होतो. यासाठी बाहेर सायकल चालवत फिरायला जावे. सायकल बाहेर चालवणे शक्य नसल्यास घरगुती जिम सायकलने एक्सरसाइज करावा.
3) मांडीची चरबी कमी करण्यासाठी एयर सायकलिंग एक्सरसाइज करा ..
मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी एअर सायकलिंगचीही मदत होते. यासाठी, पाठीवर झोपून पाय 90 अंशात वर करून पायांनी सायकल चालवल्यासारखे करावे. एक मिनिट एक्सरसाइज केल्यावर हळूहळू पाय खाली करावेत. त्यानंतर पुन्हा पाय वर उचलून उलट दिशेने सायकल चालवल्यासारखे करावे. मांड्यातील चरबी कमी करण्यासाठी एयर सायकलिंग एक्सरसाइज दररोज 5 वेळा करावा.
4) मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी पायऱ्या चढा व उतरा ..
मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी रोज पायऱ्या चढण्याचा व उतरण्याचा एक्सरसाइज करावा. तसेच लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा. यामुळे पायाचे स्नायू बळकट होऊन मांडीतील चरबी कमी होते.
5) मांडीची चरबी कमी करण्यासाठी हेल्दी आहार सेवन करा ..
मांड्यांतील चरबी कमी करण्यासाठी चरबी वाढवणारे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. यासाठी फास्टफूड, जंकफूड, मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट, साखरेचे पदार्थ, प्राणिज चरबी, तेलकट पदार्थ खाणे टाळावे. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, ताजी फळे, सुखामेवा यांचा समावेश करावा. पुरेसे पाणीही प्यावे. असा हेल्दी आहार घेतल्याने मांडीची चरबी कमी होण्यासाठी मदत होते.
अशाप्रकारे योग्य आहाराच्या जोडीला नियमित एक्सरसाइज केल्यास मांडीची चरबी कमी करणे सहज शक्य आहे.
हे सुध्दा वाचा → वजन कमी करण्याचे उपाय जाणून घ्या.
Read Marathi language article about How to reduce thigh fat. Last Medically Reviewed on March 8, 2024 By Dr. Satish Upalkar.