अननस – Pineapple :
अननस हे एक पौष्टिक आणि स्वादिष्ट फळ असून आरोग्यासाठी ते फायदेशीर असते. यात अनेक उपयुक्त पोषकघटक असतात. यामध्ये व्हिटॅमिन सी चे मुबलक प्रमाण असते. याशिवाय तांबे आणि मॅंगनीज सारखी खनिज तत्वे देखील यात असतात.
अननस खाण्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. त्वचेचे आरोग्य चांगले राहते. वजन आटोक्यात राहते. तसेच पोट साफ होते. यामुळे पोटाचा कॅन्सर आणि कोलन कॅन्सर यापासून दूर राहण्यास मदत होते.
अननस खाण्याचे 6 आरोग्यदायी फायदे –
1) अननस खाण्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
अननसमध्ये व्हिटॅमिन सी, फोलेट आणि व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
2) अननस खाण्यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहते.
अननसमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक असते. व्हिटॅमिन सी हे त्वचेतील मुख्य प्रोटीन कोलेजनच्या निर्मितीसाठी महत्वाचे असते. अननस खाण्यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे वाढत्या वयाबरोबर त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
3) अननस खाण्यामुळे पेशींचे फ्री रॅडिकल्सपासून रक्षण होते.
अननसमध्ये कॅरोटीनोइड्स आणि पॉलीफेनॉल्स या अँटिऑक्सिडंट्ससह उपयुक्त फायटोन्यूट्रिएंट्स असतात. यामुळे शरीरातील पेशींचे फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान रोखण्यास मदत होते.
4) अननस खाण्यामुळे वजन आटोक्यात राहते.
अननसमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. तर यात फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे अशी महत्त्वपूर्ण पोषकघटक भरपूर आहेत. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी अननस खाणे फायदेशीर ठरते.
5) अननस कॅन्सरला दूर ठेवण्यास मदत करते.
अननसमध्ये असणाऱ्या ब्रोमेलेन या घटकामुळे पोटाचा कॅन्सर आणि कोलन कॅन्सर यापासून दूर राहण्यास मदत होते.
6) अननस खाण्यामुळे पोट साफ होते.
अननसमध्ये फायबरचे मुबलक प्रमाण असते. यामुळे पोट साफ होण्यासाठी मदत होते.
अननस खाण्याचे तोटे –
अननस खाण्यामुळे काही जणांना ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो. अधिक प्रमाणात अननस खाल्ल्यास पचनक्रिया बिघडू शकते. यामुळे पोटदुखी, जुलाब यासारखे त्रास होऊ शकतात. तसेच यामुळे अंगातील उष्णता देखील वाढू शकतो.
अननस कोणी खाऊ नये ?
गरोदर स्त्रियांनी अननस खाऊ नये. तसेच रक्त पातळ करणारे औषध घेणाऱ्यांनी अननस खाऊ नये.
अननस मधील पोषकघटक (Pineapple Nutrition Facts) –
एक कप म्हणजे साधारण 165 ग्रॅम अननस मध्ये खालील पोषक तत्वे असतात.
कॅलरी : 82.5
चरबी : 0.2 ग्रॅम
सोडियम : 1.7mg
कर्बोदके : 22 ग्रॅम
फायबर : 2.3 ग्रॅम
साखर : 16.3 ग्रॅम
प्रथिने : 0.9 ग्रॅम
व्हिटॅमिन सी : 79 मिग्रॅ
Read Marathi language article about Pineapple health benefits and side effects. Last Medically Reviewed on February 29, 2024 By Dr. Satish Upalkar.