Guava health benefits and side effects in Marathi.

पेरू खाण्याचे फायदे व तोटे article by Dr Satish Upalkar

पेरू – Guava :

पेरू चवीला स्वादिष्ट असून यात अनेक पोषकघटक देखील असतात. पेरूमध्ये फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फोलेट, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए यांसारखी महत्त्वपूर्ण पोषकघटक असतात. पेरूच्या आतील गर हा पांढरा तसेच लाल रंगाचाही असतो.

पेरू खाण्याचे फायदे –

पेरू खाण्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. पेरू खाण्यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहते. पेरू खाण्यामुळे वजन आटोक्यात राहते. तसेच पोट साफ होते. पेरू हृदयाच्या आरोग्यासाठी चांगला असतो. पेरू खाल्याने रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. असे पेरू खाण्याचे विविध फायदे आहेत.

1) पेरू खाण्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, फोलेट आणि व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

2) पेरू खाण्यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहते.
पेरूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक असते. व्हिटॅमिन सी हे त्वचेतील मुख्य प्रोटीन कोलेजनच्या निर्मितीसाठी महत्वाचे असते. पेरू खाण्यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे वाढत्या वयाबरोबर त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

3) पेरू खाण्यामुळे पेशींचे फ्री रॅडिकल्सपासून रक्षण होते.
पेरूमध्ये कॅरोटीनोइड्स आणि पॉलीफेनॉल्स या अँटिऑक्सिडंट्ससह उपयुक्त फायटोन्यूट्रिएंट्स असतात. यामुळे शरीरातील पेशींचे फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान रोखण्यास मदत होते.

4) पेरू खाण्यामुळे वजन आटोक्यात राहते.
पेरूमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. तर यात फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे अशी महत्त्वपूर्ण पोषकघटक भरपूर आहेत. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी पेरू खाणे फायदेशीर ठरते.

5) पेरू खाणे डायबेटिस रुग्णांसाठी चांगले असते.
पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) हा अत्यंत कमी म्हणजे 12 ते 24 इतका आहे. पेरू खाण्यामुळे रक्तातील साखर एकाएकी वाढत नाही. याखेरीज पेरू खाल्याने रक्तातील साखर आटोक्यात राहण्यास मदत होते. त्यामुळे डायबेटिस रुग्णांसाठी पेरू खाणे फायदेशीर असते.

6) पेरू हृदयाच्या आरोग्यासाठी चांगला असतो.
पेरूमधील उपयुक्त अँटिऑक्सिडंट्समुळे रक्तदाब, रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे पेरू खाण्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका कमी होतो.

7) पेरू खाण्यामुळे पोट साफ होते.
पेरूमध्ये फायबरचे मुबलक प्रमाण असते. यामुळे पोट साफ होण्यासाठी मदत होते.

पेरू खाण्याचे तोटे –

पेरू खाण्यामुळे काही जणांना ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो. अधिक प्रमाणात पेरू खाल्ल्यास पचनक्रिया बिघडू शकते. यामुळे पोटदुखी, जुलाब यासारखे त्रास होऊ शकतात. तसेच यामुळे कफ देखील वाढू शकतो.

गरोदरपणात पेरू खावा की नाही याची माहिती वाचा..

पेरूतील पोषकघटक (Guava Nutrition Facts) –

एक कप (साधारण 165g) पेरूमध्ये खालील पोषकतत्वे असतात.
कॅलरी : 112
फॅट : 1.6 ग्रॅम
सोडियम : 3.3mg
कर्बोदके : 23.6 ग्रॅम
फायबर : 8.9 ग्रॅम
साखर : 14.7 ग्रॅम
प्रथिने : 4.2 ग्रॅम
व्हिटॅमिन सी : 376 मिलीग्राम
फोलेट : 81mcg
पोटॅशियम : 688mg

Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुध्दा वाचा – केळी खाण्याचे फायदे व तोटे जाणून घ्या..

6 Sources
  1. USDA, FooData Central. Guavas, common, raw.
  2. Passos TU, Sampaio HA de C, Sabry MOD, Melo MLP de, Coelho MAM, Lima JW de O. Glycemic index and glycemic load of tropical fruits and the potential risk for chronic diseases. Food Sci Technol (Campinas). 2015;35(1):66-73. doi:10.1590/1678-457X.6449
  3. National Center for Complementary and Integrative Health. Antioxidants: In Depth.
  4. Pullar JM, Carr AC, Vissers MCM. The roles of vitamin C in skin healthNutrients. 2017;9(8):866. doi:10.3390/nu9080866
  5. Kumari S, Rakavi R, Mangaraj M. Effect of guava in blood glucose and lipid profile in healthy human subjects: A randomized controlled studyJ Clin Diagn Res. 2016;10(9):BC04-BC07. doi:10.7860/JCDR/2016/21291.8425
  6. Aune D, Giovannucci E, Boffetta P, et al. Fruit and vegetable intake and the risk of cardiovascular disease, total cancer and all-cause mortality-a systematic review and dose-response meta-analysis of prospective studiesInt J Epidemiol. 2017;46(3):1029–1056. doi:10.1093/ije/dyw319

In this article information about Guava health benefits and side effects in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *