पेरू – Guava :
पेरू चवीला स्वादिष्ट असून यात अनेक पोषकघटक देखील असतात. पेरूमध्ये फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फोलेट, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए यांसारखी महत्त्वपूर्ण पोषकघटक असतात. पेरूच्या आतील गर हा पांढरा तसेच लाल रंगाचाही असतो.1
पेरू खाण्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहते. पेरूमुळे वजन आटोक्यात राहते. तसेच पोट साफ होते. पेरू हृदयाच्या आरोग्यासाठी चांगला असतो. यामुळे रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.
पेरू खाण्याचे आरोग्यदायी 7 फायदे –
1) पेरू खाण्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, फोलेट आणि व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
2) पेरू खाण्यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहते.
पेरूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक असते. व्हिटॅमिन सी हे त्वचेतील मुख्य प्रोटीन कोलेजनच्या निर्मितीसाठी महत्वाचे असते. पेरू खाण्यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे वाढत्या वयाबरोबर त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
3) पेरू खाण्यामुळे पेशींचे फ्री रॅडिकल्सपासून रक्षण होते.
पेरूमध्ये कॅरोटीनोइड्स आणि पॉलीफेनॉल्स या अँटिऑक्सिडंट्ससह उपयुक्त फायटोन्यूट्रिएंट्स असतात. यामुळे शरीरातील पेशींचे फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान रोखण्यास मदत होते.
4) पेरू खाण्यामुळे वजन आटोक्यात राहते.
पेरूमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. तर यात फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे अशी महत्त्वपूर्ण पोषकघटक भरपूर आहेत. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी पेरू खाणे फायदेशीर ठरते.
5) पेरू खाणे डायबेटिस रुग्णांसाठी चांगले असते.
पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) हा अत्यंत कमी म्हणजे 12 ते 24 इतका आहे. पेरू खाण्यामुळे रक्तातील साखर एकाएकी वाढत नाही. याखेरीज पेरू खाल्याने रक्तातील साखर आटोक्यात राहण्यास मदत होते. त्यामुळे डायबेटिस रुग्णांसाठी पेरू खाणे फायदेशीर असते.
6) पेरू हृदयाच्या आरोग्यासाठी चांगला असतो.
पेरूमधील उपयुक्त अँटिऑक्सिडंट्समुळे रक्तदाब, रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे पेरू खाण्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका कमी होतो.
7) पेरू खाण्यामुळे पोट साफ होते.
पेरूमध्ये फायबरचे मुबलक प्रमाण असते. यामुळे पोट साफ होण्यासाठी मदत होते.
पेरू खाण्याचे तोटे –
पेरू खाण्यामुळे काही जणांना ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो. अधिक प्रमाणात पेरू खाल्ल्यास पचनक्रिया बिघडू शकते. यामुळे पोटदुखी, जुलाब यासारखे त्रास होऊ शकतात. तसेच यामुळे कफ देखील वाढू शकतो.
पेरूतील पोषकघटक (Guava Nutrition Facts) –
एक कप (साधारण 165g) पेरूमध्ये खालील पोषकतत्वे असतात.
कॅलरी : 112
फॅट : 1.6 ग्रॅम
सोडियम : 3.3mg
कर्बोदके : 23.6 ग्रॅम
फायबर : 8.9 ग्रॅम
साखर : 14.7 ग्रॅम
प्रथिने : 4.2 ग्रॅम
व्हिटॅमिन सी : 376 मिलीग्राम
फोलेट : 81mcg
पोटॅशियम : 688mg
हे सुध्दा वाचा – केळी खाण्याचे फायदे व तोटे जाणून घ्या..
Read Marathi language article about Guava health benefits and side effects. Last Medically Reviewed on February 29, 2024 By Dr. Satish Upalkar.