कानात जखम होणे – Ear Injury :
कान नाजूक असतात त्यामुळे कानांची काळजीपूर्वक देखभाल घेतली पाहिजे. कानात काडी वैगेरे घालणे, कानाला मार बसणे, मोठा गोंगाट, कानातील इन्फेक्शन अशा अनेक कारणांनी कानात जखम होत असते.
कानाला झालेल्या जखमाकडे दुर्लक्ष करू नये. कारण यामुळे कानाचा पडदा खराब होणे, बहिरेपणा अशा अनेक गंभीर कानाच्या समस्या निर्माण होण्याचा धोका असतो.
कानात जखम होण्याची कारणे :
- छोटे मोठे अपघात, खेळताना कानाला झालेल्या दुखापतीमुळे कानात जखम होत असते.
- मोठ्या आवाजामुळे कानाला इजा होऊन जखम होऊ शकते.
- जोराचा वारा कानात गेल्यामुळे देखील कानाच्या पडद्याला इजा होऊन कानात जखम होऊ शकते.
- कान खाजवल्याने नखे लागून कानात जखम होऊ शकते.
- कानात बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यामुळे कानात जखम होते.
- कानात बोटे घालणे, काड्या किंवा पिना घालणे यामुळे देखील कानात जखमा होतात.
कानात जखम झाल्यास करायचे घरगुती उपाय –
- कानात जखम झाल्याने कानाजवळ दुखत असल्यास तेथे थंड शेक द्यावा. यासाठी बर्फाचे तुकडे कापडात गुंडाळून त्याद्वारे शेक द्यावा. यामुळे आराम मिळून वेदना कमी होण्यास मदत होते.
- कानात जखम झाल्यामुळे रक्त येत असेल तर तत्काळ डॉक्टरांकडे जावे.
कानात जखम झाली असल्यास घ्यायची काळजी –
- कानात जखम झाल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता ईएनटी डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्या.
- कानाचा संसर्ग पसरू देऊ नका.
- दुखापत झाल्यानंतर कान ओले करणे टाळा.
- कानाला दुखापत झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही इअर ड्रॉप्स कानात घालू नका.
कानाच्या दुखापतीवर उपचार –
कानाला झालेल्या जखमा व दुखापतीच्या तीव्रतेच्या आधारावर डॉक्टर रुग्णावर उपचार करतात. कानात जखम झाल्यास ड्रेसिंग करू शकतात तसेच अँटीबायोटिक्स औषधे आणि वेदनाशामक औषधे दिली जातात. गंभीर जखमामध्ये, शस्त्रक्रिया देखील करावी लागू शकते.
कानाला जखमा होऊ नये यासाठी घ्यायची काळजी :
- कानाची योग्य काळजी घेतल्यास कानाला होणारी इजा टाळू शकता.
- खेळ खेळताना कानाला जखम होणार नाही याची काळजी घ्यावी.
- कान साफ करण्यासाठी कानात काडी, पिना वैगेरे घालू नका.
- कानात बोटे घालून कान खाजवणे टाळा.
- कानाच्या आरोग्यासाठी मोठ्या आवाजापासून दूर राहा.
हे सुध्दा वाचा – कानातून पाणी येणे यावरील उपाय जाणून घ्या.
Read Marathi language article about Ear injury Causes, Treatments and Solutions. Last Medically Reviewed on February 22, 2024 By Dr. Satish Upalkar.