Dr Satish Upalkar’s article about Face brightening tips in Marathi.
अयोग्य खानपान, प्रखर ऊन, धूळ, प्रदूषण, केमिकलयुक्त सौंदर्य प्रसाधने, हार्मोनल असंतुलन, वृद्धत्व अशा अनेक कारणांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य बिघडत असते. या लेखात चेहरा उजळण्यासाठी कोणते उपाय करावे याची माहिती डॉ सतीश उपळकर यांनी सांगितली आहे. या उपायांमुळे चेहऱ्याची चमक वाढून तुमचा चेहरा नक्कीच उजळून निघेल.
चेहरा उजळण्यासाठी हे घरगुती उपाय करावे –
- ऑलिव्ह ऑईलने चेहऱ्याला मसाज करावा. त्यानंतर कोमट पाण्यात टॉवेल भिजवून त्याने चेहरा पुसून घ्यावा. यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य उजळून निघते.
- कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावून अर्ध्या तासाने थंड पाण्याने चेहरा धुवावा. यामुळेही तुमच्या चेहऱ्याची त्वचा उजळण्यास मदत होईल.
- रात्री झोपण्यापूर्वी हळद आणि चंदनाचा लेप चेहऱ्याला लावावा.
- पपईचा गर चेहऱ्यावर चोळावा. थोड्या वेळाने थंड पाण्याने चेहरा धुवावा. यामुळे तुमच्या चेहऱ्याचे तेज वाढून चेहरा उजळून निघेल.
- चेहऱ्याला मसूर डाळीची पेस्ट लावून हलका मसाज करावा. दहा मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा. या घरगुती उपायाने काळपटपणा निघून जाऊन चेहरा उजळण्यास मदत होते.
हे सुध्दा वाचा – चेहऱ्यावर पिंपल्स आल्यास कोणते उपाय करावेत ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
In this article information about Face brightening tips in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).