जेवल्यानंतर होणारी पोटफुगी –
बऱ्याचजणांना जेवल्यावर पोट फुगण्याचा त्रास होत असतो. अशावेळी पोट हे वायू व गॅसमुळे गच्च होते. त्यामुळे पोटात दुखू लागते, पोट गच्च होते, ढेकर येतात आणि अस्वस्थ वाटू लागते. या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी जेवल्यानंतर होणाऱ्या पोट फुगणे या समस्येवर कोणते उपाय करावेत याविषयी माहिती सांगितली आहे.
जेवल्यावर पोट फुगण्याची कारणे –
पचनास जड असणारे पदार्थ जसे तेलकट, मसालेदार पदार्थ खाण्यामुळे अपचन अपचन झाल्याने जेवल्यावर पोट फुगत असते. याशिवाय, एकाचवेळी भरपेट जेवल्यामुळे किंवा घाई गडबडीने जेवण खाल्याने पोट फुगत असते.
जेवणानंतर पोट फुगणे यावरील घरगुती उपाय :
- जेवल्यावर ग्लासभर गरम पाणी प्यावे. यामुळे पोटातील गॅस निघून जाण्यास मदत होते.
- जेवणानंतर चमचाभर ओवा आणि चिमुटभर सैंधव मीठ खावे.
- जेवल्यानंतर आल्याच्या तुकड्यास थोडेसे सैंधव मीठ लावून खावे.
हे घरगुती उपाय केल्यास जेवल्यावर होणाऱ्या पोटफुगीच्या समस्येपासून दूर राहण्यास मदत होते.
जेवल्यावर पोटफुगी होऊ नये यासाठी घ्यायची काळजी –
- एकाचवेळी भरपेट जेवणे टाळावे. त्यापेक्षा दिवसातून तीन ते चार वेळा थोडे थोडे खावे.
- जेवताना सावकाश व प्रत्येक घास चावून खावा.
- गडबडीत, पटपट खाणे टाळावे.
- जेवणानंतर लगेच झोपू नये.
- पचनास जड पदार्थ खाणे टाळावे.
- तळलेले पदार्थ, मैदायुक्त पदार्थ, मसालेदार पदार्थ, मांसाहार, हरभरा, वाटाणा, बटाटा, कोबी, शिळे आणि बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावे.
- सोडायुक्त कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे.
- सहजतेने पचणारा, हलका आहार घ्यावा.
- आहारात हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, दही यांचा समावेश करावा.
- नियमित व्यायाम करावा.
हे सुद्धा वाचा..
गॅस होण्याच्या समस्येवरील उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
In this article information about After eating Abdominal Bloating problem Causes, Treatments and Home remedies in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).