कानात फोड येणे –
काहीवेळा आपल्या कानात फोड येत असतो. कानाची त्वचा ही जास्त संवेदनशील असते. त्यामुळे कानात आलेल्या फोडाच्या ठिकाणी जास्त प्रमाणात दुखतही असते.
कानात फोड येण्याची कारणे –
पिंपल्स किंवा किसतोड मुळे कानात फोड येऊ शकतात. किसतोडमुळे आलेला फोड हा थोडा मोठा व जास्त दुखणारा असतो. त्वचेवरील केस मुळासकट निघाल्यामुळे किसतोडचा फोड येत असतो. तर पिंपल्स मुळे देखील कानात फोड येतो. कानात आलेला फोड हा सूजयुक्त व दुखणारा असतो.
कानात फोड येणे यावर उपाय –
- कानात फोड आल्यास तेथे चंदन व हळदीचा लेप लावावा.
- कानात फोड आल्यास कानात थोडे खोबरेल तेल घाला.
- कानातील फोड घालवण्यासाठी तेथे कोरफड जेल लावावा.
कानात फोड येणे यावरील उपचार –
- कानातील फोडवर अँटी-बॅक्टेरियल क्रीम देखील लावू शकता.
- कानात फोड आलेल्या ठिकाणी वेदना होत असल्यास व त्यामुळे अंग दुखत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने वेदनाशामक गोळी घेऊ शकता.
हे सुध्दा वाचा – कान दुखणे यावरील घरगुती उपाय जाणून घ्या..
Read Marathi language article about Boils on Ear Causes, Treatments and Home remedies. Last Medically Reviewed on February 24, 2024 By Dr. Satish Upalkar.