त्वचेवर चामखीळ येणे (Warts) :
त्वचेवर चामखीळ असण्याची समस्या अनेक लोकांना असते. चामखीळमुळे कोणताही विशेष त्रास होत नसला तरीही चामखीळ दिसायला चांगले वाटत नाहीत, यामुळे सुंदरताही खराब होत असते. यासाठी चामखीळ काढण्यासाठी उपयुक्त उपायांची माहिती खाली दिली आहे.
चामखीळ होण्याची कारणे :
चामखीळ हे प्रामुख्याने ह्यूमन पापिल्लोमा व्हायरसमुळे (HPV) होत असतात. चेहरा, मान, हात, पाठ, छाती आणि पोटावरही चामखीळ येऊ शकतात. चामखीळला English मध्ये Warts असे म्हणतात. तसेच चामखिळीला अंगावर मोस किंवा मस येणे असेही म्हणतात.
चामखीळ जाण्यासाठी हे करा घरगुती उपाय :
कांद्याचा रस –
कांद्याचा रस काढून नियमितपणे सकाळी व संध्याकाळी चामखीळ वर लावल्यास चामखीळ जाण्यास मदत होते.
दोरा बांधणे –
चामखीळ वर दोरा बांधण्यामुळे त्यातील रक्तप्रवाह कमी होऊन काही दिवसांनी चामखीळ निर्जीव होऊन गळून पडते.
बटाटा –
कापलेला बटाटा तात्काळ चामखीळ वर लावून घासावा. दिवसातून 3 ते 4 वेळा असे केल्याने चामखीळ सुखून पडण्यास मदत होते.
लसूण –
लसूण पाकळी मोडून चामखीळ वर लावून घासावी. असे काही दिवस नियमितपणे केल्यास चामखीळची मस्से सुखून गळून पडण्यास मदत होते.
लिंबाचा रस –
चामखीळच्या जागेवर लिंबाचा रस लावल्याने चामखीळची समस्या दूर होते. यासाठी कापसाने लिंबूचा रस चामखीळवर लावावा. लिंबू उकडून लावल्यानेही चामखीळ दूर होण्यास मदत होते.
बेकिंग सोडा आणि एरंडेल तेल –
बेकिंग सोडामध्ये थोडेसे एरंडेल तेल घालून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण रोज रात्री झोपण्यापूर्वी चामखीळ वर लावावे. यामुळेही चामखीळ निघून जाण्यास मदत होते.
तूप आणि खाण्याचा चुना –
चामखीळवर तूप आणि खायचा चुना मिक्स करून लावल्याने 5 ते 6 दिवसांत चामखीळ निघून जाण्यास मदत होते.
अळशीच्या बिया –
अळशीच्या बिया बारीक वाटून त्यामध्ये मध मिसळावे. ते मिश्रण चामखीळ वर नियमित लावल्यास 4 ते 5 दिवसात चामखीळ कमी होण्यास मदत होते.
चामखीळवर हे आहे औषध :
चामखीळ जाण्यासाठी Wartocin हे औषध किंवा Salicylic acid असणारी क्रीम उपलब्ध असते. Wartocin (वारटोसिन) हे औषध फक्त चामखीळवरच लावणे गरजेचे असते. चामखीळ शिवाय इतर भागी हे औषध लागल्यास त्याठिकाणची त्वचाही भाजल्यासारखी होते.
अंगावर चामखीळ असल्यास ही घ्यावी काळजी :
चामखीळ हे ह्यूमन पापिल्लोमा व्हायरसमुळे होत असतात. या व्हायरसमुळे चामखीळ इतर भागातही पसरण्याची शक्यता जास्त असते. यासाठी चामखीळ असल्यास त्यावर नखाने कोचत राहणे टाळावे.
याशिवाय तुम्हाला डायबेटीस असल्यास चामखीळ घालवण्यासाठी चामखीळ अगरबत्तीने भाजणे, चामखीळवर जखम करणे यासारखे उपाय न करता आपल्या डॉक्टरांकडून चामखीळवर उपचार करून घ्यावेत.
चामखीळ असल्यास डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा..?
• शरीराच्या sensitive ठिकाणी म्हणजे लैंगिक अवयव, चेहरा, तोंड किंवा नाकाच्या ठिकाणी चामखीळ असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
• चामखीळ मधून रक्त किंवा पू येत असल्यास, त्याठिकाणी जास्त वेदना होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
• चामखीळ आणि डायबेटीस किंवा रोगप्रतिकारक शक्तीचे HIV/AIDS यासारखे आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Read Marathi language article about Warts causes, types, home remedies and treatments. Last Medically Reviewed on March 8, 2024 By Dr. Satish Upalkar.