डोळ्यांची आग होणे :
काही लोकांना डोळ्यात आग होण्याची समस्या होत असते. प्रामुख्याने उन्हाळ्याचे दिवस, हवेतील प्रदूषण, धूळ, डोळ्यावरील ताण आणि ऍलर्जी यांमुळे डोळ्यांना हा त्रास होतो. यामध्ये डोळ्यात खाज सुटणे, डोळ्यात आग होणे अशी लक्षणे असतात.
डोळ्यात आग होणे यावर हे उपाय करा..
डोळ्यांची आग होत असल्यास डोळ्यांवर काकडी किंवा बटाट्याचे काप ठेवावेत किंवा डोळ्यात गुलाबजलाचे काही थेंब घालावेत. तसेच डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत. डोळ्यात आग होणे यावर हे घरगुती उपाय उपयुक्त असतात. यामुळे डोळ्याची आग कमी होण्यास मदत होते.
डोळ्यांची आग होणे यावरील घरगुती उपाय :
काकडी –
डोळ्यात आग होत असल्यास काकडीचे काप करून ते काहीवेळ डोळ्यावर ठेवावे. यामुळे डोळ्यांना आराम मिळून डोळ्यातील आग कमी होते.
बटाटा –
डोळ्यांची आग होत असल्यास डोळ्यांवर बटाट्याचे काप ठेवावेत. यामुळेही डोळ्यात आग होणे कमी होते.
गुलाब जल –
गुलाबजलाचा एक थेंब डोळ्यात घतल्यानेही डोळ्यातील आग कमी होण्यास मदत होते.
तेल मालिश –
रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या डोक्याला व तळपायांना खोबरेल तेलाने चांगली मालिश करावी. यामुळे शांत झोप लागून डोळ्यात आग होणे थांबते.
डोळे स्वच्छ पाण्याने डोळे धुवा –
दिवसातून दोन ते वेळा स्वच्छ थंड पाण्याने आपले डोळे धुवावेत. यांमुळे डोळ्यातील धूळ, कचरा निघून जाऊन डोळ्यांची आग कमी होते.
गॉगलचा वापर करा –
प्रखर उन्हात घातक असे UV किरण असतात ज्यामुळे डोळ्यांची आग होत असते. यासाठी उन्हात बाहेर फिरताना गॉगल वापरावा. गॉगल्समुळे डोळ्यात धूळ, कचरा जाण्यापासूनही रक्षण होते.
(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)
हे सुद्धा वाचा..
डोळ्यात खाज सुटत असल्यास कोणते उपाय करावेत ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.