सफरचंद सायडर व्हिनेगर म्हणजे काय?
सफरचंदाचा रस आंबवून किण्वन प्रक्रियेद्वारे हा व्हिनेगर तयार केला जातो. आरोग्य आणि सौंदर्याच्या दृष्टीने खूप सफरचंद सायडर व्हिनेगर हा खूप फायदेशीर आहे.
सफरचंद सायडर व्हिनेगरमध्ये विविध जीवनसत्त्वे, खनिजे, क्षार घटक असतात. तसेच यात ऍसिटिक ऍसिड, सायट्रिक ऍसिड, मॅलिक ऍसिड आणि एमिनो ऍसिड अशी पोषकतत्वे भरपूर प्रमाणात असतात. वजन कमी करण्यासाठी सफरचंद सायडर व्हिनेगर फायदेशीर असते. यामुळे रक्तदाब, यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. वाईट कोलेस्टेरॉल कमी होते. घाम व घामाची दुर्गंधी यामुळे कमी होते. त्वचा व केसांचे आरोग्य सुधारते.
सफरचंद सायडर व्हिनेगरचे आरोग्यदायी 5 फायदे –
1) वजन कमी करते..
वजन कमी करण्यासाठी ग्लासभर पाण्यात अर्धा किंवा एक चमचा सफरचंद सायडर व्हिनेगर मिसळून प्यावे.
2) PCOS मध्ये उपयुक्त..
पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (PCOS) ची समस्या असणाऱ्या स्त्रियांनी रात्री जेवणानंतर ग्लासभर पाण्यात अर्धा किंवा एक चमचा सफरचंद सायडर व्हिनेगर मिसळून प्यावे. यामुळे हार्मोन्सची पातळी वाढून मासिक पाळी येण्यास मदत होऊ शकते.
3) मुरूम कमी करते..
मुरूम जाण्यासाठी पाण्यात थोडे सफरचंद सायडर व्हिनेगर मिसळून चेहऱ्याला लावावे. यामुळे मुरूम कमी होतात.
4) घाम कमी करते..
घाम अधिक येत असल्यास त्याठिकाणी पाण्यात सफरचंद सायडर व्हिनेगर मिसळून लावावे. घामामुळे होणारी दुर्गंधी देखील यामुळे कमी होते.
5) केसातील कोंडा कमी होतो..
केसात कोंडा झाल्यास पाण्यात थोडेसे सफरचंद सायडर व्हिनेगर मिसळून ते केसांना लावा. व थोड्यावेळाने अंघोळ करून केस स्वच्छ करा.
सफरचंद सायडर व्हिनेगर कसे वापरतात ?
अर्धा ते एक चमचा सफरचंद सायडर व्हिनेगर हे ग्लासभर पाण्यात मिसळून वापरावे. पाण्यात न मिसळता सफरचंद सायडर व्हिनेगर खाण्यासाठी वापरू नये तसेच त्वचेवरही लावू नये.
सफरचंद सायडर व्हिनेगरचे दुष्परिणाम –
सफरचंद सायडर व्हिनेगर अधिक सेवन केल्यामुळे हिरड्या आणि घशाला सूज येऊ शकते. याच्या अधिक सेवनामुळे शरीरातील पोटॅशियमची पातळी खूप कमी होऊ शकते. पोटॅशियम हे आपल्या स्नायू आणि मज्जातंतूंच्या कार्यासाठी खूप महत्वाचे असते.
सफरचंद सायडर व्हिनेगर कोणी खाऊ नये ?
गरोदर स्त्रियांनी सफरचंद सायडर व्हिनेगर खाणे टाळावे. डायबेटिस रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार याचे सेवन करावे.
हे सुध्दा वाचा – सफरचंद खाण्याचे फायदे जाणून घ्या..
Read Marathi language article about apple cider vinegar benefits, uses and side effects. Last Medically Reviewed on February 29, 2024 By Dr. Satish Upalkar.