अंगावर चरबीच्या गाठी येणे – Lipoma :

शरीराच्या त्वचेवर होणाऱ्या चरबीच्या गाठींना लिपोमा (Lipoma) असे म्हणतात. त्वचेवर चरबीच्या गाठी येण्याची समस्या अनेकांना असते. शरीराच्या कोणत्याही भागावर अशा चरबीच्या गाठी होऊ शकतात. प्रामुख्याने मान, खांदा, हात, मांडी, पोट आणि पाटीवर अशा गाठी होत असतात.

ह्या चरबीच्या गाठी benign ट्युमर प्रकारच्या असतात. त्यामुळे त्या गाठी कॅन्सरच्या नसतात. चरबीच्या गाठी ह्या धोकादायक ठरत नसल्याने त्यावर उपचार करण्याचीही फार आवश्यकता नसते.

चरबीच्या गाठी का व कशामुळे येतात?

चरबीच्या गाठी नेमक्या कशामुळे येतात याची ठोस कारणे अद्यापही माहीत झालेली नाही. 40 ते 60 वर्षाच्या व्यक्तींमध्ये हा त्रास अधिक प्रमाणात आढळतो. कुटुंबात चरबीच्या गाठी येण्याची अनुवांशिकता असणे, जेनेटिक फॅक्टर, हार्मोन्समधील बदल यांमुळे हा त्रास होऊ शकतो.याशिवाय Madelung’s आजार, काउडन सिंड्रोम, गार्डनर सिंड्रोम, एडीपोसिस डोलोरोसा यासारख्या आजारामुळे चरबीच्या गाठी येऊ शकतात.

चरबीची गाठ कशी असते..?

अनेक प्रकारच्या गाठी त्वचेवर होऊ शकतात. त्यापैकी चरबीच्या गाठी ह्या त्यांच्या विशिष्ट लक्षणांवरून ओळखता येतात.

  • अशा गाठींना स्पर्श केल्यास त्या मऊ जाणवतात.
  • बोटांनी दाबल्यास ती गाठ आजूबाजूला हलत असते.
  • त्या गाठीमुळे कोणत्याही वेदना होत नाहीत.
  • त्वचेच्या रंगासारख्याचं त्या गाठी असतात.
  • गाठींची वाढ अगदी सावकाशपणे होत असते.
  • चरबीच्या गाठी ह्या मान, खांदा, हात, मांडी, पोट आणि पाटीवर होत असतात. अशाप्रकारे अंगावरील चरबीची गाठ असते.

सामान्यपणे चरबीच्या गाठी दुखत नसतात, त्यात कोणत्याही वेदना नसतात. पण ह्या सारख्याच गाठी angiolipoma ह्या स्थितीमध्येही असतात. मात्र angiolipoma मधील गाठी ह्या अधिकप्रमाणात दुखत असतात.

अंगावर चरबीच्या गाठी झाल्यास डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक असेल..?

जर त्वचेवरील गाठी ह्या एकाएकी मोठ्या होत असल्यास किंवा त्यांच्या रंगामध्ये फरक जाणवत असल्यास किंवा गाठींच्या ठिकाणी वेदना अधिक होत असल्यास डॉक्टरांकडे जाऊन निदान व उपचार करणे आवश्यक आहे.

चरबीची गाठ आणि त्याचे निदान :

त्वचेवरील गाठींच्या स्वरूपावरून चरबीची गाठ ओळखणे सोपे असते. तर काही वेळा बायोप्सी, MRI स्कॅन किंवा CT स्कॅनद्वारे गाठेची तपासणी केली जाऊ शकते. कॅन्सरची गाठ कशी असते ते जाणून घ्या..

चरबीच्या गाठी वरील उपचार – Lipoma Treatment :

चरबीच्या गाठी ह्या धोकादायक नसतात. त्यामुळे त्यावर उपचार करण्याची विशेष गरज नसते. मात्र जर गाठी मोठ्या असतील, त्यामुळे वेदना होत असल्यास उपचार करावे लागू शकतात. सर्जरी, लिपोसक्शन (Liposuction) याद्वारे चरबीच्या गाठीवर उपचार केले जातात.

सर्जरी – चरबीची गाठ मोठी असल्यास सर्जरी करून ती गाठ काढून टाकली जाते.

लिपोसक्शन (Liposuction) – यामध्ये सुई व सिरिंज यांचा वापर करून चरबीच्या गाठीचा आकार कमी केला जातो.

अंगावरील चरबीच्या गाठी कमी करण्यासाठी उपाय –

  • खोबरेल तेलात उटणे मिसळून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट रोज अंघोळीपूर्वी चरबीच्या गाठींना लावावी व हाताने मसाज करावा.
  • रोज रात्री झोपण्यापूर्वी चरबीच्या गाठीच्या ठिकाणी हळदीचा लेप लावावा. यामुळे चरबीच्या गाठी कमी होण्यास मदत होते.
  • चरबीच्या गाठी असणाऱ्या ठिकाणी एरंडेल तेल लावून मसाज करावा. यामुळेही त्वचेवर असणाऱ्या चरबीच्या गाठी निघून जातात.
  • दररोज ग्लासभर कोमट पाण्यातून लिंबूरस मिसळून प्यावे. तसेच लिंबाचा रस गाठीना लावावा.

हे घरगुती उपाय चरबीच्या गाठी घालवण्यासाठी तुम्ही करू शकता.

हे सुध्दा वाचा –
त्वचेवर खाज होत येण्याची कारणे व उपचार

कॅन्सरची गाठ कशी असते ते जाणून घ्या..

Read Marathi language article about Lipoma causes, symptoms and treatments. Last Medically Reviewed on February 28, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.

Join the Conversation

5 Comments

  1. माझ्या अंगावर चरबीच्या गाठी आल्यात हा त्रास कधी कमी होईल?

  2. चरबीच्या गाठी लवकर कमी होत नाहीत. नियमित काही दिवस सांगितलेले उपाय तुम्ही करा. यामुळे हळूहळू या गाठी कमी होतील.

  3. चरबीच्या गाठीवर आयुर्वेदिक उटणे लावून मालिश करा. काही दिवस हा उपाय केल्याने चरबीच्या गाठी कमी होतील.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *