नाकाला वास येत नाही –
काहीजणांची नाकाला वास येण्याची क्षमता कमी होत असते. ही समस्या प्रामुख्याने ऍलर्जी किंवा सर्दी अशा कारणांनी होत असते. नाकाची वास घेण्याची क्षमता कमी होणे ही काही गंभीर समस्या नसते, परंतु त्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर काही प्रमाणात होऊ शकतो. जसे वासाची जाणीव कमी झाल्यामुळे व्यक्ती खाद्यपदार्थांचा सुगंध घेऊ शकत नाही.
नाकाला वास कशामुळे येत नाही..?
ऍलर्जी, सायनसची समस्या, नाक किंवा घशाचा संसर्ग, नाकाचे हाड वाढणे, नाकात मांस वाढणे, हार्मोन्स मधील असंतुलन, वृद्धावस्था, स्मृतिभ्रंश किंवा इतर न्यूरोलॉजिकल समस्या, काही औषधांचे परिणाम, यामुळे नाकाची वास घेण्याची क्षमता कमी होऊ शकते.
नाकाला वास येत नाही यावर उपाय :
रोज रात्री झोपण्यापूर्वी षडबिंदू नस्य तेल किंवा अणू तेलाचे दोन थेंब नाकात टाकावे. या आयुर्वेदिक उपायाने नाक मोकळे होऊन नाकाची वास घेण्याची क्षमता वाढते.
नाकाला वास येत नसल्यास कोमट केलेल्या एरंडेल तेलाचे दोन थेंब नाकात टाकावे. या उपायाने नाकाची वास घेण्याची क्षमता वाढण्यास मदत होते.
नाकाला वास येत नसल्यास आल्याचा तुकडा चावून खावा. हे उपाय नाकाला वास येत नसल्यास उपयोगी पडतात.
हे सुध्दा वाचा – नाकात मांस वाढणे यावरील उपाय जाणून घ्या..
Read Marathi language article about anosmia Causes and Home remedies. Last Medically Reviewed on February 24, 2024 By Dr. Satish Upalkar.