नाकातील हाड वाढणे लक्षणे, कारणे व नाकाचे हाड कमी करण्यासाठी उपाय

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Deviated septum।Causes, symptoms, and treatment in Marathi, nakache had kami karnyasathi upay

नाकाचे हाड वाढणे म्हणजे काय..?

आपल्या उजव्या आणि डाव्या नाकपुडीच्यामध्ये पातळ हाडापासून बनलेले Nasal Septum (नाकाचा पडदा) असते. काहीवेळा या नाकाच्या पडद्याचे हाड वाकडे होऊ शकते. या वाकड्या हाडालाच बोलीभाषेत ‘नाकाचं हाड वाढणे’ असे म्हंटले जाते. तर या त्रासाला वैद्यकीय भाषेत Deviated Nasal Septum असे संबोधले जाते.

नाकाचे हाड वाढण्याची कारणे :

अनेक कारणांमुळे नाकाचे हाड वाढण्याची समस्या होत असते. याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
• जन्माच्या वेळी नाकाच्या हाडावर दाब आल्यामुळे,
• नाकाला मार बसल्यामुळे,
• मारामुळे नाकाचं हाड फ्रॅक्चर होऊन वाकल्यामुळे
• याशिवाय मार्फन्स सिंड्रोम, Homocystinuria ह्यासारखे जन्मजात आजार झाल्यामुळेही नाकाच्या पडद्याचे हाड वाकडे होऊन नाकातील हाड वाढू शकते.

नाकाचे हाड वाढणे लक्षणे :

नाकाचे हाड वाढल्यामुळे अनेक जणांना याचा काहीही त्रास जाणवत नाही. तसेच काही जणांमध्ये खालील त्रासही होऊ शकतो.
• नाकाने श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो,
• वारंवार सर्दी होणे, नाक चोंदने,
• नाकातून पाणी येणे, वारंवार शिंका येणे,
• सायनस इन्फेक्शन होणे,
• नाकाच्या ठिकाणी दुखणे,
• डोकेदुखी होणे,
• नाकातून रक्त येणे,
• कोणतीही एक नाकपुडी कोरडी पडणे,
• झोपेत घोरणे असा त्रास यामुळे होऊ शकतो.
याशिवाय नाकाचं हाड जास्त वाढल्यास, नाकाचा पडदा जास्त वाकडा झाल्यास नाकाची ठेवणी बदलते, त्यामुळे अशा नाकामुळे चेहऱ्याच्या सौंदर्यात बाधा होऊ शकते.

नाकातील हाड वाढणे निदान :

नाकातून श्वास घेण्यास त्रास होत असल्यास किंवा वर दिलेली वारंवार सर्दी होणे, सायनस यासारखा त्रास होत असल्यास कान-नाक-घसा तज्ज्ञ (ENT स्पेशालिस्ट) डॉक्टरांकडून होणाऱ्या त्रासाचे निदान व उपचार करून घ्यावे.

नाकाचे हाड वाढणे उपचार :

उपचारामध्ये या त्रासावर आपले डॉक्टर नाकातील सूज वैगेरे लक्षणे कमी करण्यासाठी decongestants, antihistamines ही औषधे देऊ शकतात. तसच नाकातील ड्रॉप्स (nasal steroid spray) ही देऊ शकतात.

नाकाच्या हाडाचे ऑपरेशन –

वरील औषध उपचाराने त्रास कमी होत नसल्यास नाकाच्या पडद्याची शस्त्रक्रिया (Septoplasty)करून वाकडा झालेला पडदा सरळ केला जातो. या शस्त्रक्रियेबद्दल कोणताही गैरसमज मनात ठेवू नये.

ही शस्त्रक्रिया कोणी करून घ्यावी..?
ज्यांना नाकातील हाड वाढल्यामुळे खूप त्रास होतो अशा व्यक्ती ही शस्त्रक्रिया करून घेऊ शकतात.

नाकाच्या हाडाचे ऑपरेशन केल्यानंतर ते हाडं पुन्हा वाढते का..?
एकदा ऑपरेशन केल्यानंतर पुन्हा नाकाचे हाड वाढत नाही. कारण वयाच्या साडेसोळा वर्षापर्यंतचं नाकाच्या हाडाची वाढ पूर्ण होत असते. त्यानंतर नाकाचे हाड वाढत नाही.

लहान वयाच्या मुलांमध्ये नाकाच्या पडद्याचे ऑपरेशन करता येते का..?
नाही, कारण वयाच्या साडेसोळा वर्षापर्यंत नाकाच्या हाडाची वाढ पूर्ण होत असते. त्यामुळे वयाच्या साडेसोळा वर्षानंतरच हे ऑपरेशन प्रामुख्याने केले जाते.

हे सुद्धा वाचा..
नाकातील मांस वाढणे :

नाकात मांस वाढणे याला नोजल पॉलीप असे म्हणतात. नाकातील पॉलिप नाकात तसेच सायनसमध्येही होऊ शकतात. हे प्रामुख्याने एलर्जी, अस्थमा आजार किंवा इन्फेक्शनमुळेही होऊ शकतात. नाकात मांस वाढण्याची कारणे व त्यावरील उपचार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Deviated Nasal Septum Symptoms, Surgery & Treatment in Marathi.

© कॉपीराईट सुचना -
कृपया ह्या वेबसाईटमधील माहिती कॉपी-पेस्ट करू नये. येथील माहिती कॉपी करून आपल्या नावाने प्रसिद्ध किंवा शेअर किंवा Video बनवता येणार नाही.