नाकात मांस वाढणे – Nasal Polyps :
नाकात मांस वाढणे याला नोजल पॉलीप असेही म्हणतात. हा त्रास पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. नाकातील पॉलिप नाकात तसेच सायनसमध्येही होऊ शकतात. हे प्रामुख्याने एलर्जी, अस्थमा आजार किंवा इन्फेक्शनमुळेही होऊ शकतात.
नाकातील वाढलेल्या मांसाचा आकार छोटा असल्यास त्यावर उपचार करणे फारसे गरजेचे नसते. मात्र जर पॉलिपचा आकार मोठा असल्यास उपचार करावे लागू शकतात. कारण त्याच्या मोठया आकारामुळे सायनसचा मार्ग बंद होऊन म्युकस सायनसमध्येच साठून राहिल्याने त्याठिकाणी इन्फेक्शन होऊ शकते. त्यामुळे सायनसला सूज येऊन नाकाभोवती वेदना होऊ शकतात.
नाकातील मांस वाढणे याची लक्षणे –
नाकात मांस वाढल्यामुळे बहुतेक जणांना याचा काहीही त्रास जाणवत नाही. तर काही जणांमध्ये मात्र खालील त्रासही होऊ शकतो.
- नाकाने श्वास घेण्यास त्रास होणे,
- नाक चोंदने,
- वारंवार सर्दी, नाकातून पाणी आणि शिंका येणे,
- सायनस इन्फेक्शन होणे,
- नाकाच्या ठिकाणी दुखणे,
- डोकेदुखणे,
- झोपेत घोरणे, स्लीप ऍप्निया असा त्रास यामुळे होऊ शकतो.
नाकात मास वाढण्याची कारणे –
खालील कारणांमुळे नाकात मांस वाढू शकते.
- आनुवंशिक घटकांमुळे,
- सायनस इन्फेक्शनमुळे,
- दमा (अस्थमा) आजार असल्यामुळे,
- एलर्जिक राइनाइटिसमुळे,
- Cystic fibrosis मुळे,
- तसेच ऍस्पिरिन किंवा ibuprofen ह्या औषधांच्या परिणामामुळेही हा त्रास होऊ शकतो.
वरील त्रास वारंवार होत असल्यास कान-नाक-घसा तज्ज्ञ (ENT स्पेशालिस्ट) डॉक्टरांकडून नाकाची तपासणी करून होणाऱ्या त्रासाचे निदान व उपचार करून घ्यावे.
नाकात मांस वाढणे यावरील उपचार –
नाकातील पॉलिप्स मधील सूज कमी करण्यासाठी आपले डॉक्टर औषधे देतील. याशिवाय नाकात घालण्यासाठी ड्रॉप्स, स्प्रे दिले जातील. औषध उपचाराने त्रास थांबत नसल्यास सर्जरीचा पर्याय निवडला जातो. यासाठी Polypectomy ही सर्जरी करून नाकातील वाढलेले मांस (पॉलिप्स) काढून टाकले जातात.
हे सुध्दा वाचा – नाकातील हाड वाढणे याची कारणे, लक्षणे व उपचार जाणून घ्या..
Read Marathi language article about Nasal polyps Symptoms, Causes and Treatments. Last Medically Reviewed on February 24, 2024 By Dr. Satish Upalkar.