नाकात फोड येणे व नाकातील माळीणवर घरगुती उपाय

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Boils in nose treatment in Marathi, Pimple inside nose home remedies in Marathi.

नाकात फोड येणे :

नाकपुडीच्या आतील भागात फोड किंवा बॉइल, पिंपल येत असतात. या त्रासाला ‘नाकात माळीण होणे’ असेही म्हणतात. प्रामुख्याने बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे आणि उष्णतेमुळे नाकात फोड येत असतात. नाकात फोड किंवा माळीण आल्याने त्याठिकाणी सूज येऊन खूप वेदना होतात.

नाकातील माळीणवर घरगुती उपाय :

नाकात फोड उटणे यावरील उपाय खाली दिले आहेत.

सुगंधी फुले –
माळीण उटल्यास मोगरा यासारख्या सुगंधी फुलाचा वास घेत राहिल्यास हा त्रास लवकर कमी होतो.

साजूक तूप –
माळीण उटल्यास नाकात साजूक तुपाचे काही थेंब घातल्यानेसुध्दा नाकातील फोड कमी होण्यास मदत होते.

नाकात फोड आल्यास कोणती काळजी घ्यावी..?

• नाकामधले येणारे फोड आपोआप बरे होतात.
• नाकात फोड झाल्यास ते फोड नखांनी फोडणे किंवा बोटांनी दाबू नयेत.
• मधुमेह असल्यास नाकात माळीण किंवा शरीरावर बॉईल झाल्यास विशेष काळजी घ्यावी व आपल्या डॉक्टरांचा सल्लाही घ्यावा.

नाकातून रक्त येणे उपाय :

घोळणा फुटणे किंवा नाकातून रक्त येण्याचा त्रास अनेकांना असतो. अनेक कारणांमुळे नाकातून रक्त येऊ शकते. नाकातून रक्त येणे यावरील उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Boils or Pimple inside nose home remedies in Marathi.

© कॉपीराईट सुचना -
कृपया ह्या वेबसाईटमधील माहिती कॉपी-पेस्ट करू नये. येथील माहिती कॉपी करून आपल्या नावाने प्रसिद्ध किंवा शेअर किंवा Video बनवता येणार नाही.