डोळे लालसर होणे –

बऱ्याचवेळा आपले डोळे लाल झालेले असतात. अनेक कारणांनी डोळे लालसर होऊ शकतात. विशेषतः डोळ्यातील इन्फेक्शन, अँलर्जी अशा कारणांमुळे डोळे लालसर होतात.

डोळे लालसर होणे याची कारणे –

  • डोळ्याला दुखापत होणे,
  • डोळ्यात धुळ किंवा कचरा गेल्यामुळे,
  • डोळे अधिक खाजवल्यामुळे,
  • डोळ्यात इन्फेक्शन झाल्याने,
  • अँलर्जी,
  • स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही यांचा अतिवापर,
  • मद्यपान सारखी व्यसने,
  • तसेच हाय ब्लडप्रेशर, काचबिंदू अशा आजारामुळे डोळे लालसर होऊ शकतात.

डोळे लालसर होणे यावरील घरगुती उपाय :

  • डोळे लाल होत असल्यास डोळ्यांना थंडगार शेक द्यावा. यासाठी फ्रीजमध्ये ठेवलेल्या काकडीचे काप करून ते डोळ्यावर ठेवावे.
  • डोळे लाल होत असल्यास बटाट्याचे काप करून ते डोळ्यावर ठेवावे. हा घरगुती उपाय केल्यानेही ही समस्या दूर होण्यास मदत होते.
  • डोळे किमान दिवसातून तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवावेत. यांमुळे डोळ्यातील घाण निघून जाऊन डोळे लालसर होणे कमी होते.
  • डोळे लाल होत असल्यास गुलाबजलात भिजवलेले कापसाचे बोळे डोळ्यावर काही वेळ ठेवावेत.
  • एक थेंब गुलाबजल डोळ्यात घतल्याने डोळ्यातील लालसरपणा दूर होण्यास मदत होते.
  • एरंडेल तेलात भिजलेला कापसाचा बोळा डोळ्यावर काही वेळ ठेवावा.

डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक आहे..?

बरेच दिवस लालसर डोळ्यांची समस्या असल्यास किंवा डोळ्यांनी अस्पष्ट दिसत असल्यास, डोळे दुखत असल्यास, डोळ्यांना दुखापत झाल्याने डोळे लाल झाले असल्यास नेत्ररोगतज्ज्ञ डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.

डोळ्यांची अशी घ्यावी काळजी..

  • आपले डोळे दिवसातून तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवा.
  • धुळ, कचरा डोळ्यात जाऊ नये यासाठी दर्जेदार गॉगलचा वापर करा.
  • भर उन्हात फिरताना टोपी, छत्री आणि गॉगलचा वापर करा.
  • डोळ्यांची अधुनमधून उघडझाप करा.
  • कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असल्यास ते नियमितपणे स्वच्छ करा. रात्रभर कॉन्टॅक्ट लेन्स घालू नका.
  • ‎स्मार्टफोन, टीव्ही अशा उपकरणांचा मर्यादित वापर करा.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यात कोणतेही आयड्रॉप्स घालू नका.
  • जर डोळ्यांतील लालसरपणा कमी न झाल्यास आपल्या नेत्ररोगतज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हे सुध्दा वाचा – डोळ्यांची आग होणे यावरील उपाय जाणून घ्या.

Read Marathi language article about Eye redness causes and home remedies. Last Medically Reviewed on February 24, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.