डोळ्यात आग होणे (Burning eyes) :
काही लोकांना डोळ्यात आग होण्याची समस्या होत असते. उन्हाळ्याचे दिवस, धूळ, प्रदूषण, डोळ्यावरील ताण आणि ऍलर्जी यांमुळे डोळ्यात आग होऊ लागते. ह्या त्रासात डोळ्यात खाज सुटणे, डोळ्यात वेदना होणे, लालसर डोळे होणे अशी लक्षणे असतात. डोळ्यांची आग होणे ही एक सामान्य अशी डोळ्यांची समस्या असून काही उपाय केल्यास व डोळ्यांची योग्य काळजी घेतल्यास ही समस्या दूर होते.
डोळ्यांची आग का होते..?
अनेक कारणांनी डोळ्यांची आग होऊ लागते. प्रामुख्याने उन्हाळ्याचे दिवस, हवेतील प्रदूषण, धूळ, डोळ्यावरील ताण, अपुरी झोप, स्मार्टफोन-टीव्ही यांचा अतिवापर आणि ऍलर्जी अशा कारणांमुळे डोळ्यांची आग होते.
डोळ्यांची आग होणे यावर घरगुती उपाय –
डोळ्यात आग होत असल्यास फ्रजमधील काकडीचे थंड काप डोळ्यांवर ठेवावेत. यामुळे डोळ्यांना आराम मिळून होणारी आग कमी होते. यासाठी तुम्ही बटाट्याचे काप सुध्दा डोळ्यावर ठेऊ शकता. तसेच डोळ्यांची आग होत असल्यास डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत. हे घरगुती उपाय डोळ्यात आग होणे यावर उपयोगी आहेत. यामुळे डोळ्याची आग कमी होण्यास मदत होते.
डोळ्यात आग होत असल्यास काय करावे..?
1) काकडीचे काप डोळ्यावर ठेवावे.
डोळ्यात आग होत असल्यास काकडीचे काप करून ते काहीवेळ डोळ्यावर ठेवावे. यामुळे डोळ्यांना आराम मिळून डोळ्यातील आग कमी होते. काकडी खाण्याचे फायदे जाणून घ्या..
2) डोक्याला व तळपायांना खोबरेल तेल मालिश करावी.
रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या डोक्याला व तळपायांना खोबरेल तेलाने चांगली मालिश करावी. यामुळे शांत झोप लागून डोळ्यात आग होणे कमी होते.
3) डोळे स्वच्छ पाण्याने डोळे धुवावेत.
दिवसातून दोन ते वेळा स्वच्छ थंड पाण्याने आपले डोळे धुवावेत. यांमुळे डोळ्यातील धूळ, कचरा निघून जाऊन डोळ्यांची आग कमी होते.
4) उन्हात फिरताना गॉगलचा वापर करा.
प्रखर उन्हात घातक असे UV किरण असतात ज्यामुळे डोळ्यांची आग होत असते. यासाठी उन्हात बाहेर फिरताना गॉगल वापरावा. गॉगल्समुळे डोळ्यात धूळ, कचरा जाण्यापासूनही रक्षण होते.
हे सुद्धा वाचा..
डोळ्यात खाज सुटत असल्यास कोणते उपाय करावेत ते जाणून घ्या..
Read Marathi language article about Burning eyes Causes and Home remedies. Last Medically Reviewed on March 8, 2024 By Dr. Satish Upalkar.