दहा महिन्याच्या बाळाचा आहार, वजन आणि झोप अशी असावी – 10 month baby care tips in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

दहा महिन्यांचे बाळ :

बाळाच्या जन्मापासूनच ते बाळ थोडे मोठे होईपर्यंत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. याठिकाणी दहा महिन्याच्या बाळाची घ्यावयाची काळजी याची सविस्तर माहिती दिली आहे.

दहा महिन्याच्या बाळाचे वजन आणि उंची :

प्रत्येक बाळाचा शारीरिक विकास वेगवेगळा असतो.
बालकाचे (baby boy) चे वजन 7.5 ते 11.2 किलो आणि उंची 76 सेमी पर्यंत इतकी असू शकते. 
तर बालिकेचे (baby girl) चे वजन साधारण वजन 6.8 ते 10.7 किलो असते आणि उंची सुमारे 74 सेमी पर्यंत असू शकते.

दहा महिन्यांच्या बाळातील विकासाचे टप्पे :

• आधाराने उभे राहते.
• आनंदाने टाळ्या वाजविते.
• टाटा करणे, छोटी वाक्ये त्याला समजू लागतात.
• बोललेली शब्दे बोलते.
• बाबा, मामा, काका अशी शब्दे बोलते.
• वस्तू ओळखते, पुस्तकातील रंगीत चित्रे पाहून आंनदी होते.

दहा महिन्याच्या बाळाचा आहार असा असावा :

या वयातील बाळांसाठी दिवसातून दोन ते तीनवेळा स्तनपान किंवा फॉर्म्युला दूध द्यावे. याबरोबरचं दिवसातून चार ते पाच वेळा ठोस आहार बाळास भरवावा. डाळ भात वरण, भाजी, चपाती, फळे, दुधाचे पदार्थ, मऊ मांस, मासे, अंडे यांचा समावेश आहारात असावा.
• मऊ शिरा, उपमा, साबुदाणा खिचडी किंवा तांदूळ वा नाचणीची खीर भरवावी.
• दहीभात किंवा तूप घालून वरणभात, डाळभात भरवावी.
• गाजर, भोपळा, बटाटा, मटार, रताळे, सफरचंद यासारख्या भाज्या किंवा फळे चांगल्याप्रकारे उकडून, मऊ लगदा करून बाळास भरवावा.
• केळे, आंबा, टरबूज, सीताफळ, चिक्कू या फळांचा गर भरवावा.
• चांगले शिजलेले मांस, मासे यातील हाडे काढून मऊ भाग बाळाला भरवू शकता.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

दहा महिन्याच्या बाळाची झोप :

दहा महिन्याचे बाळ साधारण 10 ते 13 तास झोप घेत असते. बाळाची वाढ आणि विकासासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक असते.

दहाव्या महिन्यात बाळाच्या विकासासाठी हे करा :

दहा महिन्याचे बाळ आधार घेऊन उभे राहत असते. अशावेळी आपण त्याच्या हाताला आधार देऊन त्याला थोडी पावले टाकण्यास मदत करावी. याशिवाय,
• अंघोळ घालण्यापूर्वी बाळाला मालिश करावी.
• बाळाला रंगीबेरंगी खेळणी आणून द्यावीत.
• बाळाबरोबर खेळण्यांनी खेळावे.
• पुस्तकातील रंगीत चित्रे दाखवावी.
• बाळाला झोपवताना छान छान अंगाई गीते म्हणावीत.

डॉक्टरांकडे कधी जावे..?

बाळाला ताप, अतिसार, उलट्या, सर्दी, खोकला असे त्रास झाल्यास बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जावे.

प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पासून ते बाळाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती देणारे उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


वरील माहिती आपणास आवडल्यास आमचे Youtube चॅनेल subscribe जरूर करा. असेच उपयुक्त माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ आपणास मोफत उपलब्ध होतील. यासाठी खालील YouTube बटनावर क्लिक करा..