दहा महिन्यांचे बाळ :
बाळाच्या जन्मापासूनच ते बाळ थोडे मोठे होईपर्यंत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या लेखात दहा महिन्याच्या बाळाची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती डॉ सतीश उपळकर यांनी सांगितली आहे.
दहा महिन्याच्या बाळाचे वजन आणि उंची :
प्रत्येक बाळाचा शारीरिक विकास वेगवेगळा असतो.
बालकाचे (baby boy) चे वजन 7.5 ते 11.2 किलो आणि उंची 76 सेमी पर्यंत इतकी असू शकते.
तर बालिकेचे (baby girl) चे वजन साधारण वजन 6.8 ते 10.7 किलो असते आणि उंची सुमारे 74 सेमी पर्यंत असू शकते. वयानुसार बाळाचे वजन व उंची किती असावी ते जाणून घ्या..
दहा महिन्यांच्या बाळातील विकासाचे टप्पे :
- या वयाचे बाळ आधाराने उभे राहते.
- ते आनंदाने टाळ्या वाजविते.
- टाटा करणे, छोटी वाक्ये बाळाला समजू लागतात.
- बोललेली शब्दे बाळ बोलते.
- बाबा, मामा, काका अशी शब्दे ते बोलते.
- वस्तू ओळखते, पुस्तकातील रंगीत चित्रे पाहून बाळ आंनदी होते.
दहा महिन्याच्या बाळाचा आहार असा असावा –
दहा महिन्याच्या बाळासाठी दिवसातून दोन ते तीनवेळा स्तनपान किंवा फॉर्म्युला दूध द्यावे. याबरोबरचं दिवसातून चार ते पाच वेळा ठोस आहार बाळास भरवावा. डाळ भात वरण, भाजी, चपाती, फळे, दुधाचे पदार्थ, मऊ मांस, मासे, अंडे यांचा समावेश आहारात असावा.
- मऊ शिरा, उपमा, साबुदाणा खिचडी किंवा तांदूळ वा नाचणीची खीर बाळाला खाऊ घालावी.
- दहीभात किंवा तूप घालून वरणभात, डाळभात खाऊ घालावा.
- गाजर, भोपळा, बटाटा, मटार, रताळे, सफरचंद यासारख्या भाज्या किंवा फळे चांगल्याप्रकारे उकडून, मऊ लगदा करून बाळास खायला द्यावे.
- केळे, आंबा, टरबूज, सीताफळ, चिक्कू या फळांचा गर बाळाला खायला द्यावा.
- चांगले शिजलेले मांस, मासे यातील हाडे काढून मऊ भाग बाळाला भरवू शकता.
दहा महिन्याच्या बाळाची झोप :
दहा महिन्याचे बाळ साधारण 10 ते 13 तास झोप घेत असते. बाळाची वाढ आणि विकासासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक असते.
दहाव्या महिन्यात बाळाच्या विकासासाठी हे करा :
दहा महिन्याचे बाळ आधार घेऊन उभे राहत असते. अशावेळी आपण त्याच्या हाताला आधार देऊन त्याला थोडी पावले टाकण्यास मदत करावी. याशिवाय,
- अंघोळ घालण्यापूर्वी बाळाला मालिश करावी.
- बाळाला रंगीबेरंगी खेळणी आणून द्यावीत.
- बाळाबरोबर खेळण्यांनी खेळावे.
- पुस्तकातील रंगीत चित्रे दाखवावी.
- बाळाला झोपवताना छान छान अंगाई गीते म्हणावीत.
डॉक्टरांकडे कधी जावे..?
बाळाला ताप, अतिसार, उलट्या, सर्दी, खोकला असे त्रास झाल्यास बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जावे.
हे सुध्दा वाचा – 11 महिन्याच्या बाळाची काळजी कशी घ्यावी ते जाणून घ्या.
Read Marathi language article about 10 months baby care. Last Medically Reviewed on March 10, 2024 By Dr. Satish Upalkar.