व्हिटॅमिन D चे महत्व –
- ‘ड’ जीवनसत्व हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे असे vitamin असते.
- ‘ड’ जीवनसत्त्वामुळे पाठीचा कणा, हाडे, किडनी यांचे आरोग्य सुधारते.
- हाडे मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी ते आवश्यक.
- ते रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते.
- मांसपेशींच्या कार्यात मदत करते.
- मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांपासून बचाव करते.
‘ड’ जीवनसत्वाचे आहार स्त्रोत :
- सूर्यप्रकाश: सूर्यप्रकाशातून त्वचेद्वारे शरीरात ‘ड’ जीवनसत्व तयार होते. जर ‘ड’ जीवनसत्त्व नैसर्गिकरीत्या मिळवायचं असेल तर कोवळ्या सूर्यप्रकाशात भरपूर फिरावं.
- मासे: मासे (उदा. रावस, बोंबील) हे ‘ड’ जीवनसत्वाचे उत्तम स्रोत आहेत.
- अंडी: अंड्याचा पिवळा भाग ‘ड’ जीवनसत्वाने समृद्ध असतो.
- दुग्धजन्य पदार्थ: दूध, दही, पनीर ‘ड’ जीवनसत्वाचे चांगले स्रोत.
- मशरूम: काही प्रकारचे मशरूम ‘ड’ जीवनसत्वाचे स्त्रोत आहेत.
- ड’ जीवनसत्वाने समृद्ध पदार्थ: दूध आणि दुधाचे पदार्थ, अळंबी, बदाम, अक्रोड, ऑलिव्हची फळं यात ‘ड’ जीवनसत्त्वाचं प्रमाण भरपूर असतं.
ड’ जीवनसत्त्व घ्या.. अगदी मोफत..!
सर्वात जास्त ‘ड’ जीवनसत्त्व कोवळ्या सूर्यप्रकाशात मानवी शरीरात नैसर्गिकरीत्या तयार होतं. दररोज 20 मिनिटं तरी कोवळा सूर्यप्रकाश अंगावर घेणं आवश्यक आहे. कोवळा सूर्यप्रकाश हा सर्वांसाठी मोफत आणि मुबलक असा व्हिटॅमिन ‘डी’ चा सर्वात मोठा स्रोत आहे.
कमीतकमी ‘ड’ जीवनसत्वाची दररोजची गरज :
- प्रौढांसाठी: 600 IU प्रतिदिन.
- मुलांसाठी: 400 IU प्रतिदिन.
‘ड’ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे काय होते..?
पाठीचा कणा वाकतो, हाडांत दोष निर्माण होतात, किडनीचे विकार आणि मूत्रमार्गातील दोष निर्माण होतात.
‘ड’ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारे आजार:
- रिकेट्स: हाडांच्या वाढीत अडथळा, हाडे कमकुवत होणे.
- ऑस्टियोपोरोसिस: हाडे कमकुवत आणि ठिसूळ होणे.
- स्नायू दुखणे.
- थकवा आणि कमकुवतपणा.
- रोगप्रतिकारशक्ती कमी होणे.
- मधुमेह आणि कर्करोगाचा धोका वाढणे.
Article about Vitamin D sources fruit and vegetables list in Marathi. This article Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on February 10, 2024.