गरोदरपणातील दातदुखी :
हिरड्यांना सूज येणे किंवा दात दुखणे ही गर्भावस्थेत होणारी एक सामान्य समस्या आहे. गरोदरपणातील हार्मोन्समुळे हिरड्यांना सूज येते व त्याठिकाणी वेदना देखील होऊ लागतात. फ्लॉस किंवा ब्रश करताना हिरड्यातून रक्तही होऊ शकते. या त्रासाला प्रेग्नन्सीतील जिंजिविटिस असे म्हणतात.
गरोदरपणात दात दुखणे यावरील उपाय :
सकाळी एकदा आणि रात्री झोपण्यापूर्वी असे दोनवेळा दात घासावे. दात घासण्यासाठी फ्लोराईड टूथपेस्ट किंवा सेन्सेटिव्ह टूथपेस्ट वापरावी. ब्रशमुळे जर आपल्या हिरड्यांना त्रास होत असेल तर मऊ ब्रश वापरावा. तसेच जेवणानंतर चूळ जरूर भरावी. दातदुखीचा त्रास अधिक होत असल्यास डेंटिस्टचा सल्ला घ्यावा.
दातदुखी आणि हिरड्यांना सूज आल्यास पेरूची पाने स्वच्छ करून ते चावत राहिल्यास हिरड्यांना आलेली सूज कमी होण्यास व दातदुखी दूर होण्यास मदत होते.
हे सुद्धा वाचा..
गरोदरपणात घ्यावयाची काळजी
Read Marathi language article about Tooth Pain during Pregnancy. Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.