गर्भधारणा टाळण्याचे उपाय :

गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोम, कॉपर टी, व्हजायनल रिंग, गर्भनिरोधक गोळ्या असे अनेक सुरक्षित पर्याय आज उपलब्ध झाले आहेत. यांचा वापर केल्याने नको असलेली गर्भधारणा टाळता येणे शक्य असते.

मात्र काहीवेळा पुरेशी खबरदारी न घेतल्याने म्हणजे सेक्सच्यावेळी कंडोमचा वापर न करणे, कंडोम फाटण्यामुळे किंवा रोजच्या गर्भनिरोधक गोळ्या खाणे विसरल्यामुळे अनावश्यक गर्भधारणा होण्याची शक्यताही असते. अशावेळी काय करावे? यासाठी येथे नको असलेली pregnancy टाळण्यासाठी काय करावे, गर्भधारणा टाळण्याचे कोणते उपाय आहेत याविषयी माहिती दिली आहे.

इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्या :

सेक्सनंतर होणारी गर्भधारणा टाळण्यासाठी इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्या लवकरात लवकर घेणे हा पर्याय खूप उपयुक्त असतो. यासाठी इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सची गोळी सेक्सनंतर शक्य तितक्या लवकर म्हणजे 72 तासांच्या आत घेणे आवश्यक असते. यामुळे गर्भधारणा टाळण्यास मदत होते.

सेक्सनंतर गर्भधारणा होऊ नये यासाठीच फक्त या गोळ्यांचा वापर होतो. मात्र आधीच जर गर्भधारणा झालेली असल्यास, पोटात गर्भ वाढत असल्यास या गोळ्यांचा काहीही उपयोग होऊ शकत नाही. ‎इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्यांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्यांचा वापर हा ‘इमर्जन्सी’ मध्येच कधीतरी होणे आवश्यक असते. अशा गोळ्या महिन्यातून एक ते दोनवेळाच वापरणे योग्य असते. इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्यांचा वापर सतत करणे धोकादायक असते. या गोळ्यांच्या अतिवापरामुळे स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या तक्रारी होऊ शकतात.

प्रेग्नसी टाळण्यासाठीचे अन्य उपाय :

अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी पुरुष किंवा स्त्रिया कंडोमचा वापर करू शकतात. याशिवाय स्त्रियांच्या गर्भाशयात कॉपर-टी बसवता येते, तसेच स्त्रिया यासाठी नियमित घेण्याच्या गर्भनिरोधक गोळ्या घेऊ शकतात.

जर कायमस्वरूपी गर्भधारणा टाळायची असल्यास पुरुषांत नसबंदी शस्त्रक्रिया किंवा स्त्रियांत टाक्याचे, बिनटक्याचे ऑपरेशन केले जाते. गर्भधारणा टाळण्यासाठी वर दिलेले सर्व पर्यायच सुरक्षित आहेत. त्यामुळे गर्भधारणा टाळण्यासाठी अन्य कोणतेही घरगुती उपाय करू नयेत. कारण गर्भधारणा टाळण्यासाठी कोणत्याही घरगुती उपायांचा काहीच उपयोग होत नाही.

प्रेग्नंट झाले आहे की नाही हे पाहण्यासाठी प्रेग्नसी टेस्ट करणे आवश्यक असते. घरच्याघरी प्रेग्नसी टेस्ट कशी करावी याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Tips for Preventing unintended pregnancy in Marathi information.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...