सेंद्रिय गुळ खाण्याचे फायदे (Organic Jaggery Health benefits)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

सेंद्रिय गुळ म्हणजे काय..?

सेंद्रिय गुळाची निर्मिती करताना त्यात कोणतेही केमिकल्स वापरले जात नाहीत. सेंद्रिय गूळ दिसायला तांबूस काळसर रंगाचा (red-dark brown color) आणि मऊ असतो. आरोग्यासाठी अशा रसायनविरहित सेंद्रिय गुळाचे फायदे अनेक असतात.

केमिकल्स असणारा गुळ आरोग्यासाठी अपायकारक असतो. केमिकल्सयुक्त गुळ तयार करताना विविध रसायने वापरली जातात. यामध्ये गंधक (सल्फर), सोडीयम हायड्रोफॉस्फेट, कॅल्शियम ऑक्साईड, सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट यांचा वापर केला जातो.

केमिकल्सचा वापर प्रामुख्याने गुळाची चव, रंग आणि गुळ अधिक काळ टिकण्यासाठी केला जातो. गुळाला अधिक पिवळा रंग येण्यासाठी गंधक पावडर (सल्फरची पावडर) मिसळली जाते. यामुळे गुळाच्या पिवळ्या रंगावर न भाळता काळसर तांबूस असलेला सेंद्रिय गूळच खाण्यासाठी वापरला पाहिजे.

सेंद्रिय गुळाचे फायदे :

अनेक पोषकतत्वे असतात..
सेंद्रिय गुळामध्ये शरीराला आवश्यक असणारे अनेक पोषकघटक असतात. सेंद्रिय गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅंगनीज, व्हिटॅमिन-B, कॅल्शिअम, जस्त, फॉस्फरस व तांबे यासारखी अनेक महत्वाची पोषकतत्वे असतात.

हिमोग्लोबिन वाढवते..
सेंद्रिय गुळात लोहाचे प्रमाण जास्त असल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास वाढण्यास मदत होते. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्याने ऍनिमिया किंवा पांडुरोग होत असतो. अशावेळी ऍनिमिया दूर करण्यासाठी सेंद्रिय गुळ खाणे फायदेशीर असते.

रक्तदाब नियंत्रित ठेवतो..
सेंद्रिय गूळ खाण्यामुळे ब्लडप्रेशर योग्य ठेवण्यास मदत होते. कारण गुळात मुबलक प्रमाणात पोटॅशिअम असल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.

मांसपेशी बळकट बनवतो..
सेंद्रिय गुळामध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नेशियमचे प्रमाण असते. यामुळे मांसपेशी बळकट होण्यासाठी मदत होते.

पचनशक्ती सुधारते..
सेंद्रिय गुळ खाण्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच नियमित पोट साफ होऊन बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.

लिव्हर डिटॉक्सिफिकेशन करते..
सेंद्रिय गूळ खाण्यामुळे आपल्या यकृताच्या यकृतातील अपायकारक विषारी घटक दूर होण्यास (लिव्हर डिटॉक्सिफिकेशन होण्यास) मदत होते.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

डायबेटीसचे पेशंट सेंद्रिय गूळ खाऊ शकतात का..?

सेंद्रिय गुळ खाण्याचे फायदे अनेक असले तरीही डायबेटीस रुग्णांनी कोणत्याही प्रकारचा गूळ खाणे शक्यतो टाळावे. कारण गुळ खाण्यामुळे रक्तातील साखर (ब्लड शुगर) वाढू शकते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यानी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गुळ खाऊ नये. डायबेटीसविषयी अधिक माहिती जाणून घ्या..

गरोदरपणात सेंद्रिय गुळ खाऊ शकतात का..?

गरोदरपणात लोहाचे खूप महत्त्व असते. तसेच सेंद्रिय गुळात अनेक पोषकघटक असतात. त्यामुळे गरोदर स्त्रियांनी आणि डिलिव्हरीनंतरही सेंद्रिय गूळ खाणे उपयोगी असते.

Web title – Organic & natural jaggery health benefits in Marathi.