गुळाच्या चहाचे फायदे व तोटे जाणून घ्या – Jaggery tea benefits in Marathi

गुळाचा चहा – Jaggery Tea :

गूळामध्ये साखरेपेक्षा जास्त पोषकघटक असतात. त्यामुळे साखरेच्या चहापेक्षा गुळाचा चहा पिणे चांगले असते. गुळाच्या चहाचे फायदे अनेक आहेत. विशेषतः हिवाळ्यात थंडीच्या दिवसात गुळाचा चहा पिणे लाभदायी असते. हिवाळ्यात गुळापासून बनलेला चहा पिल्याने थंडपणाची भावना कमी होते. गुळाचा चहा पिण्याचे फायदे खाली दिले आहेत.

गुळाचा चहा पिण्याचे हे आहेत फायदे :

आवश्यक पोषकतत्वे मिळतात..
गुळाचा चहा पिण्यामुळे शरीराला आवश्यक असणारे अनेक पोषकघटक मिळतात. कारण गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅंगनीज, व्हिटॅमिन-B, कॅल्शिअम, जस्त, फॉस्फरस व तांबे यासारखी अनेक महत्वाची पोषकतत्वे असतात. यामानाने साखरेत कोणतेही पोषकघटक नसतात. त्यामुळे आरोग्याचा विचार करता गुळाचा चहा पिणे फायदेशीर ठरते.

हिमोग्लोबिन वाढवते..
रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्याने ऍनिमिया किंवा पांडुरोग होत असतो. अशावेळी हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यासाठी गुळाचा चहा पिणे फायदेशीर ठरतो. कारण हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या लोहाचे प्रमाण गुळामध्ये मुबलक असते.

ब्लडप्रेशर नियंत्रित ठेवतो..
गुळाचा चहा पिण्यामळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. त्यामुळे हाय ब्लडप्रेशरचा त्रास असणाऱ्यांसाठी गुळाचा चहा पिणे उपयोगी ठरतो. गुळात मुबलक प्रमाणात पोटॅशिअम असल्याने ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये राहतो.

थकवा दूर होतो..
गूळ घातलेला चहा पिण्यामुळे आलेला थकवा दूर होण्यास मदत होते. त्यामुळे थकवा जाणवत असल्यास गुळाचा चहा प्या, तुम्हाला आराम मिळेल.

दमा व खोकल्यावर उपयुक्त..
गुळाचा चहा पिण्यामुळे दमा, खोकला, सर्दी यासारखे कफाचे विकार कमी होण्यास मदत होते.
 

गुळाचा चहा बनवण्याची पद्धत :

नेहमीच्या चहाप्रमाणेच आपण गुळाचाही चहा करू शकता. मात्र साखरेच्याऐवजी गुळाचा वापर करावा. याशिवाय आणखी हेल्दी आणि स्वादिष्ट चहा होण्यासाठी त्यात आपण आलं, वेलची, तुळशीची पाने एकत्र करू शकता. चहा उकळ्यानंतर त्यात गरजेनुसार दूध मिसळून गुळाचा चहा पिऊ शकता.

गुळाचा चहा कोणी प्यावा..?

जे लोक साखरेचा चहा पितात त्यांनी आरोग्यासाठी गुळाचा चहा प्यावा.

गुळाचा चहा कोणी पिऊ नये..?

डायबेटीसच्या रुग्णांनी गुळाचा चहा पिऊ नये. कारण गुळाचा चहा पिण्यामुळे ब्लड शुगर वाढू शकते. त्यामुळे डायबेटीस रुग्णांनी गुळाचा (व साखरेचाही) चहा पिणे टाळावे.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

तसेच आमवात (Rheumatoid arthritis) चा त्रास असल्यास गुळाचा चहा पिणे टाळावे. कारण गुळात sucrose चे प्रमाण अधिक असल्याने आमवातात सांध्यातील सूज अधिक वाढू शकते. येथे क्लिक करा व आमवाताविषयी अधिक माहिती वाचा..

गुळाच्या चहामुळे होणारे नुकसान :

आरोग्याचा विचार करता कोणतीही गोष्ट प्रमाणातच सेवन करणे आवश्यक असते. दिवसभरात एक ते दोनवेळा चहा पिणे पुरेसे असते. मात्र दिवसभरात वरचेवर चहा पित राहिल्याने आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. याला गुळाचा चहाही अपवाद नाही.

गुळाचा चहा अधिक पिण्यामुळे यातील कॅलरीजमुळे अधिक वजन वाढू शकते. वजन अधिक वाढण्यामुळे डायबेटीस, हृद्यविकार होण्याचा धोकाही वाढू शकतो. येथे क्लिक करा व डायबेटीसविषयी अधिक माहिती वाचा..

© लेखक- डॉ. सतीश उपळकर
ही माहिती आपणास आवडल्यास आमचे Youtube चॅनेल subscribe जरूर करा. असेच उपयुक्त माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ आपणास मोफत उपलब्ध होतील. यासाठी खालील YouTube subscribe बटनावर क्लिक करा.