डोळे खोल जाण्याची कारणे व डोळे आत गेल्यास हे करा घरगुती उपाय

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

डोळे खोल जाणे – Sunken eyes in Marathi :

काहीवेळा डोळे खोल गेल्यासारखे वाटत असते. अशावेळी डोळे आत गेलेले असतात तसेच डोळ्यांभोवतीचा भाग हा डार्क काळसर दिसू लागतो. याशिवाय शरीरात अशक्तपणा जाणवू शकतो. चेहऱ्याकडे पाहिल्यास ती व्यक्ती आजारी असल्याचे दिसून येते.

डोळे खोल जाण्याची कारणे – Hollow eyes causes :

डोळे खोल जाण्याची कारणे अनेक आहेत. प्रामुख्याने आजारपण, अशक्तपणा, आहारातील पोषकघटकांची कमतरता, डिहायड्रेशन, अपुरी झोप, तणाव, चिंता, वाढते वय, स्मोकिंग यासारखी कारणे यासाठी जबाबदार असतात.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

डोळे आत जाणे यावरील घरगुती उपाय :

• संतुलित व पुरेसा आहार घ्यावा.
• आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, सुखामेवा, दूध व दुधाचे पदार्थ, अंडी, मांस, मासे यांचा समावेश असावा.
• दिवसभरात पुरेसे म्हणजे साधारण 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. यामुळे डिहायड्रेशन होत नाही.
• जागरण करणे टाळावे. पुरेशी झोप घ्यावी.
• रात्री झोपण्यापूर्वी डोक्याला खोबरेल तेल लावून थोडी मालिश करावी.
• डोळ्याखाली काळे डाग आलेले असल्यास काकडीचे काप डोळ्यांवर थोडावेळ ठेवावेत.
• डोळ्यांभोवती बदाम तेल लावल्यानेही डार्क सर्कल कमी होण्यास मदत होते. हे घरचे उपाय यासाठी उपयुक्त ठरतात.
• मानसिक ताण घेऊ नये.
• चहा, कॉफी वारंवार पिणे टाळावे.
• स्मोकिंग, अल्कोहोल यासारख्या व्यसनांपासून दूर राहावे.

अशी काळजी घेतल्यास डोळे खोल जाणे ही समस्या निश्चितच दूर होईल.

हे सुद्धा वाचा..
डोळ्याखालील काळी वर्तुळे जाण्यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

वरील माहिती आपणास आवडल्यास आमचे Youtube चॅनेल subscribe जरूर करा. असेच उपयुक्त माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ आपणास मोफत उपलब्ध होतील. यासाठी खालील YouTube बटनावर क्लिक करा..