Dr Satish Upalkar’s article about Dark lips home remedies in Marathi.
ओठ काळे पडणे –
आपल्या सुंदर ओठांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य खुलत असते. मात्र काहीवेळा आपले ओठ काळे पडू लागतात. ओठ काळे होण्याची अनेक कारणे असतात. यातील काही कारणे ही वैद्यकीय तर काही जीवनशैली संबंधित असू शकतात. या लेखात ओठ काळे का पडतात त्याची कारणे व उपाय याविषयी माहिती सांगितली आहे.
ओठ काळे पडण्याची कारणे –
ओठ काळे होणे हे प्रामुख्याने त्वचेमध्ये जास्त प्रमाणात मेलेनिनची निर्मिती होत असल्यास, हायपरपीगमेंटेशनमुळे होत असते. याशिवाय खालील कारणेही यासाठी जबाबदार ठरतात.
- उन्हात अधिक फिरणे,
- कमी पाणी पिणे,
- ऍनिमियामुळे ओठ काळे पडतात,
- व्हिटॅमिन्स व पोषकघटकांची कमतरता,
- सिगारेट धूम्रपानाचे व्यसन,
- चहा, कॉफी वारंवार पिण्याची सवय,
- याशिवाय टूथपेस्ट, लिपस्टिक इत्यादीतील घटकांचा ओठांच्या त्वचेवर ऍलर्जीक परिणाम होत असल्यास ओठ काळे पडतात.
ओठ काळे पडणे यावरील घरगुती उपाय –
ओठ काळे पडल्यास रोज झोपण्यापूर्वी लिंबाची फोड ओठांवर हळुवार चोळावी. हा घरगुती उपाय नियमित 30 दिवस केल्याने काळे ओठ गुलाबी होण्यासाठी मदत होते. याशिवाय हळदीची पेस्ट ओठांवर लावून हलका मसाज केल्यास काळ्या ओठांची समस्या दूर होते. तसेच कोरपडीचा ताजा गर ओठांवर चोळाल्यास काळे ओठ गुलाबी होण्यासाठी मदत होते. हे घरगुती उपाय ओठ काळे पडणे यावर उपयुक्त ठरतात.
ओठ काळे पडले असल्यास काय करावे..?
1) लिंबाची फोड ओठांवर हळुवार चोळावी.
लिंबात असणारे सायट्रिक ऍसिड हे मेलेनिनवर इनहिबिटरप्रमाणे कार्य करते. त्यामुळे ओठ काळे पडण्याच्या समस्येवर लिंबाचा वापर उपयोगी ठरतो. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी लिंबाची फोड आपल्या ओठांवर हळुवार चोळावी. हा घरगुती उपाय नियमित 30 दिवस करणे आवश्यक आहे.
2) लिंबाच्या फोडीवर साखर लावून ती ओठांवर हळुवार चोळावी.
रोज रात्री झोपण्यापूर्वी लिंबाच्या फोडीवर थोडी साखर लावून त्या लिंबाने ओठांना मसाज करावा. दुसर्या दिवशी सकाळी, ओठ कोमट पाण्याने स्वच्छ धुवावेत. काळे ओठ गुलाबी होण्यासाठी हा नैसर्गिक उपाय उपयुक्त आहे.
3) लिंबू रसात मध मिसळून ते ओठांना लावावे.
दीड चमचा लिंबाच्या रसात 1 चमचा मध मिसळून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या ओठांना लावावे व दुसऱ्या दिवशी सकाळी, ओठ कोमट पाण्याने स्वच्छ धुवावेत.
4) हळदीची पेस्ट ओठांना लावावी.
हळदसुद्धा अँटी-मेलेनिन गुणधर्माची असते. थोड्याशा हळदीमध्ये चमचाभर दूध घालून पातळ पेस्ट तयार करावी. ही पेस्ट आपल्या बोटांनी ओठांवर लावून थोडावेळ मसाज करावा. त्यानंतर थंड पाण्याने ओठ स्वच्छ धुवावेत. काळे ओठ गुलाबी होण्यासाठी हा आयुर्वेदिक उपाय उपयोगी आहे.
5) कोरपडीचा गर ओठांवर चोळावा.
ओठ काळे पडणे यावर कोरपडीचा गरसुद्धा उपयुक्त ठरतो. यासाठी ताजा कोरपडीचा गर घेऊन त्याने ओठांवर मसाज करावा.
6) गुलाबजलात मध मिसळून ते ओठांना लावावे.
सहा ड्रॉप्स मधामध्ये 2 ड्रॉप्स गुलाबजल घालून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण दिवसातून तीन वेळा आपल्या ओठांना लावावे.
हे सुद्धा वाचा..
चेहरा सुंदर दिसण्यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
In this article information about Dark lips Causes and Home remedies solutions in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar. (Certified physician and Healthcare expert).