शेपू भाजी – Dill leaves :

बऱ्याच जणांना शेपूची भाजी ही त्याच्या वासामुळे खायायला आवडत नाही. मात्र शेपूची भाजी आरोग्यासाठी खूपच चांगली असते. ही भाजीसुध्दा अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असते. बाराही महिने शेपू बाजारात उपलब्ध असते. तूरडाळ किंवा मुगाची डाळ घालून केलेली शेपूची भाजी ही खूपच रुचकर अशी असते.

शेपू भाजीची नावे –
English name – Dill leaves
Botanical Name – Anethum graveolens

शेपू भाजी ही पोटाच्या विकारात उपयुक्त असते. यामुळे पोट साफ न होणे अशा समस्या दूर होतात. या भाजीमुळे हिमोग्लोबिन वाढते. मासिक पाळीच्या तक्रारी कमी होतात. शेपूमध्ये महत्त्वाची अँटिऑक्सिडंट्स असतात. हृदयाच्या आरोग्यासाठी शेपू भाजी फायदेशीर असते. वजन आटोक्यात राहण्यास मदत होते. यामुळे हाडे मजबूत होतात. तसेच मधुमेह रुग्णांसाठी ही भाजी चांगली असते.

शेपू ची भाजी खाण्याचे 8 आरोग्यदायी फायदे :

1) महत्त्वाची अँटिऑक्सिडंट्स मिळतात..
शेपू भाजीमध्ये फ्लेव्होनॉइड्स, टेरपेनॉइड्स, टॅनिन अशी आरोग्यासाठी उपयुक्त असणारी अँटिऑक्सिडंट्स असतात. यामुळे हृदयरोग, पक्षाघात, अल्झायमर, संधिवात आणि कर्करोग अशा आजारांपासून संरक्षण होण्यास मदत होते. टेरपेनॉइड्स या अँटिऑक्सिडंटमुळे यकृत, हृदय, किडनी आणि मेंदूच्या आजारांपासून संरक्षण होत असते.

2) हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर..
शेपू भाजीत असणाऱ्या फ्लेव्होनॉइड्स ह्या अँटिऑक्सिडंटमुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते. यामुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसराइडचे प्रमाण कमी होते. यामुळे धमनीकाठिण्यता (Atherosclerosis), हार्ट अटॅक, पक्षाघात, हाय ब्लड प्रेशर या विकारांचा धोका कमी होतो.

3) पोटाच्या विकारावर उपयुक्त..
शेपूच्या भाजीत फायबर्सचे प्रमाण भरपूर असल्याने बद्धकोष्ठता किंवा पोट साफ न होणे यासारख्या समस्या दूर होतात.

4) मधुमेहींसाठी योग्य..
मधुमेह असणारे रुग्ण हे शेपूची भाजी खाऊ शकतात. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. मधुमेहाविषयी अधिक माहिती जाणून घ्या..

5) हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त..
शेपूच्या भाजीत कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचे मुबलक प्रमाण असते. हे सर्व घटक आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. यामुळे हाडे मजबूत होण्यासाठी शेपू भाजी आहारात समाविष्ट करावी. विशेषतः ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी ही भाजी जरूर खाल्ली पाहिजे.

6) वजन आटोक्यात राहते..
शेपूच्या भाजीत फायबर्सचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे भुक नियंत्रित होऊन वजन आटोक्यात राहण्यास मदत होते. त्यामुळे जर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचे असल्यास आहारात शेपूची भाजी समाविष्ट करा.

7) हिमोग्लोबिन वाढवते..
शेपूच्या भाजीत लोहाचे प्रमाण जास्त असल्याने हिमोग्लोबिन कमी असणाऱ्यानी ही भाजी आहारात घ्यावी. रक्तल्पता किंवा ऍनिमिया आजारात ही भाजी जरूर खावी.

8) मासिक पाळीच्या तक्रारी दूर करते..
हार्मोन्सच्या असंतुलनामुळे बऱ्याच स्त्रियांना मासिक पाळीमध्ये पोटात दुखणे, जास्त रक्त जाणे, अनियमित पाळी असणे असे त्रास होऊ लागतात. शेपू भाजी आहारात असल्यास मासिक पाळीच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते. त्यामुळे स्त्रियांनी शेपूची भाजी ही आवर्जून खाल्ली पाहिजे.

शेपू भाजी खाण्याचे तोटे व होणारे नुकसान –

शेपूची भाजी खाल्याने काही जणांना ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो. तसेच शेपू भाजी अधिक खाण्यामुळे ढेकर येणे, पोटात गॅस होणे, मळमळणे, पोटात दुखणे, पोट फुगणे, अतिसार अशा समस्या होऊ शकतात.

गरोदर स्त्रिया किंवा स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी जास्त प्रमाणात शेपू भाजी खाऊ नये.

शेपू भाजीतील पोषकघटक (Nutritional Value) :

शेपूच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन-A, व्हिटॅमिन-C चे प्रमाण भरपूर असते. तसेच आयर्न (लोह), फोलेट, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर्स (तंतुमय पदार्थ) यासारखी अनेक पोषकतत्वे यात असतात.

एक कप शेपूच्या भाजीत पुढील पोषकतत्वे असतात.
कॅलरीज: 4
व्हिटॅमिन-C: दैनिक गरजेपैकी 8%
मॅंगनीज: दैनिक गरजेपैकी 5%
व्हिटॅमिन-A: दैनिक गरजेपैकी 4%
फोलेट: दैनिक गरजेपैकी 3%
लोह: दैनिक गरजेपैकी 3%

हे सुध्दा वाचा – मेथीची भाजी खाण्याचे फायदे जाणून घ्या..

Read Marathi language article about Shepu bhaji Benefits and side effects. Last Medically Reviewed on February 29, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *