Women’s annual health checkup list in Marathi.

महिलांसाठी आवश्यक हेल्थ चेकअप लिस्ट :

आजच्या व्यस्त जीवनामध्ये महिलांना आपल्या आरोग्याविषयी अत्यंत जागरूक असणे गरजेचे झाले आहे. आज महिलांमध्ये हृद्यविकार, मधुमेह, स्तनाचा कर्करोग, गर्भाशय कर्करोग, हाडांचे विकार, रक्तदाब या सारखे विविध गंभीर विकार उद्भवत आहेत. त्यामुळे अकाली मृत्यु होण्याचे प्रमाण वाढले आहे. या ‘सायलंट किलर’ ठरणाऱ्या विकारांचे वेळीचं निदान झाल्यास त्यापासून आपला बचाव करणे शक्य आहे यासाठी वेळोवेळी हेल्थ चेकअप करून घेणे गरजेचे झाले आहे.

सामान्य आरोग्य तपासणी (Health checkup for Women’s) –
महिलांनी नियमित एक किंवा दोन वर्षातून एकदा आपल्या शरीराचे चेकअप करून घ्यावे. यामुळे भविष्यात होणाऱ्या रोगांचे निदान वेळीचं होण्यास मदत होते. याशिवाय तीन किंवा चार वर्षातून एकदा थायराइड टेस्ट (TSH, T3, T4 Thyroid test) जरूर करून घ्या असे केल्याने थायराइड ग्रंथी संबंधीत विविध रोग होण्यापासून रक्षण करता येते.

हाडांची तपासणी :
Bone Density Test
वाढत्या वयाबरोबर आपली हाडे कमजोर होऊ लागतात. हाडे ठिसुळ बनल्याने (Osteoporosis) अनेक रोगांना निमंत्रण मिळते यासाठी हाडांचे चेकअप करने गरजेचे आहे. महिलांनी आपली बीएमडी म्हणजे बोन मिनरल डेंसिटी टेस्ट ची तपासनी वयाच्या 50शी नंतर करून घ्यावी.

ब्रेस्ट कैंसर चेकअप :
Breast cancer checkup in Marathi
बहुतांश वेळेला स्त्रीला स्वत:ला स्तनांचा कर्करोग झाला आहे हे कळतच नाही. जेव्हा कळतं तेव्हा उशिर झालेला असतो. आज भारतीय स्त्रियांना होणा-या कर्करोगाच्या प्रकारांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचं प्रमाण सर्वात जास्त आहे आणि सुमारे 13 लाख स्त्रीया या स्तनांच्या कर्करोगाने पिडित आहेत. स्तनांचा कर्करोग हा असा आजार आहे की, ज्याचे जितक्या लवकर निदान होईल तितक्या लवकर यावर उपाय करणे शक्य होते.

यासाठी वयाच्या 35 शी नंतर वर्षातून एकदा मेमोग्राफी टेस्ट व क्लीनिकल ब्रेस्ट चेक-अप करणे तर 35 वर्षाच्या आतिल स्त्रियांनी किमान दोन वर्षाआड तज्ञांकडून क्लीनिकल ब्रेस्ट चेक-अप करुन घ्यावी. या टेस्टमुळे सुरवातीच्या अवस्थेमध्येचं स्तन कैंसर ला ओळखून त्याला अटकाव करण्यास मदत होते.

डायबिटीज चेकअप :
डायबिटीज म्हणजेचं मधुमेहापासून रक्षण करण्यासाठी वयाच्या 30शी नंतर वर्षातून एकदा ब्लड ग्लूकोस टेस्ट करून घ्या. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कळते आणि डायबिटीज आणि त्याच्या दुष्परीणामापासून रक्षण करण्यास मदत होते.

ह्रदय तपासणी :
महिलांनी वयाच्या 30शी नंतर वर्षातून एकदा ब्लड प्रेशर स्क्रीनिंग टेस्ट आणि ECG टेस्ट करून घ्यावी. यामुळे विविध हृद्यरोगांपासून रक्षण करता येते. याशिवाय 35 वर्षानंतर दर पाच वर्षातून एकदा कोलेस्ट्रॉल स्क्रीनिंग टेस्ट जरूर करून घ्या.

रिप्रोडक्टिव हेल्थ :
प्रजनन संस्थेचे आरोग्य राखण्यासाठी वयाच्या 21-65 वर्षानंतरच्या प्रत्येक स्त्रीने 3 वर्षातून एकदा तरी पॅप टेस्ट करून घेणे गरजेचे आहे. पॅप स्मिअर टेस्ट करून सर्वाइकल कैंसर, गर्भाशयाच्या कर्करोगाचे वेळीचं निदान करता येते.

तर वंधत्वाची समस्या होऊ नये म्हणून 18 ते 40 वयाच्या महिलांनी नियमित ‘पीसीओएस’ संबंधी हेल्थ चेकअप करून घ्या. ‘PCOS’ हे सध्याच्या काळात वंध्यत्वाचे एक सर्वाधिक प्रमुख कारण बनले आहे.

In this article information about Women’s annual health checkup list in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).


प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *