Knee pain treatment in Marathi, Knee replacement in Marathi, Knee pain Marathi tips, Gudaghe dukhi Marathi mahiti.

गुडघेदुखी म्हणजे काय..?

Knee pain in Marathi information.
बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव यांमुळे आज उतारवयात प्रामुख्याने होणारा गुडघेदुखी सारख्या विकाराने आज अगदी तरुण वयामध्ये गुडघा कुरकूर करू लागल्याची तक्रार वाढलेली आहे. मात्र, व्यस्त जीवनामुळे, रोग अंगावर काढण्याच्या सवयीमुळे गुडघेदुखीवर सुरुवातीपासूनचं दुर्लक्ष केल्याने अखेर शेवटच्या टप्प्यातील गुडघ्याचा आर्थ्रायटिस जडल्याचे निष्पन्न होते. मगं आर्थ्रायटिस जडल्यानंतर डॉक्टरांकडून सांधे बदलाचे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला जातो. सांधे बदलाचे ऑपरेशन ही आता नवीन बाब राहिलेली नाही. पण तरीही अनेकजण माहितीअभावी या ऑपरेशनबाबत साशंक असतात. यासाठी येथे आर्थ्रायटिसमधील सांधे बदलाच्या उपचार पध्दतीची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

दररोजची धावपळ-व्यस्तपणा, घरच्या जबाबदाऱ्या अशी असंख्य कारणे पुढे करून सुरवातीच्या काळात होणाऱ्या गुडघेदुखीकडे अनेकजन दुर्लक्ष करतात. परस्पर गुडघेदुखीवर घरच्या घरी उपचार सुरु करतात. नानाविध तेले गुडघेदुखीवर लावली जातात. वेदनाशामक गोळ्या (पेनकिलर्स) घेतात. आणि तरिही वेदना वाढत गेल्यावर मगं डॉक्टरकडे धाव घेतात. अनेकदा तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. तोपर्यंत शेवटच्या टप्प्यातील आर्थ्रायटिस जडलेला असतो. अशा वेळेस पेशंटनी ऑपरेशन करून घेणे हिताचे ठरते.

गुडघेदुखीची लक्षणे :

Knee arthritis symptoms in Marathi.
• गुडघ्यामध्ये प्रचंड वेदना होतात. रुग्णाला दररोजची कामे करतानाही त्रास होतो.
• सांधे दुखावणे, सांध्याची हालचाल मंदावणे.
• सांध्यावर सूज येणे,
• चालल्यावर गुडघेदुखी वाढणे व आराम केल्यास बरे वाटणे,
• उठायला बसायला त्रास होणे,
गुडघेदुखीचा त्रास जास्त वाढल्यास, योग्य उपचार न केल्यास पेशंटचे गुडघे वाकडे झालेले असतात.

गुडघेदुखीची कारणे :

Knee pain Causes in Marathi.
गुडघेदुखी व संधिवात हा आजार वयोमानानुसार होणारा आजार आहे. जसे व्यक्तीचे वय वाढत जाते त्याप्रमाणे सांध्यातील कुर्चांची झीज होत जाते त्यामुळे गुडघेदुखी होते. याशिवाय खालील कारणे गुडघेदुखीस सहाय्यक ठरतात..
• व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली आणि लठ्ठपणा ही कारणे गुडघेदुखी होण्यास सहाय्यक ठरतात.
• लठ्ठ व्यक्तींच्या वजनामुळे गुडघ्यावर अतिरिक्त भार निर्माण होऊन कुर्चांची झीज वाढते.
• तसेच गुडघ्याच्या ठिकाणी आघात झाल्यामुळे गुडघे दुखू लागतात.

गुडघेदुखी उपचार मराठी माहिती :

Knee pain Treatments in Marathi.
गुडघेदुखीवर वेळीच योग्य न केल्यास हा त्रास पुढे वाढतच जातो. यासाठी गुडघेदुखीच्या त्रासावर वेळीच योग्य उपचार करणे आवश्यक असते.

गुडघेदुखीवरील गुणकारी औषधांची माहिती देणारी उपयुक्त ‘गुडघेदुखी उपचार मार्गदर्शन पुस्तिका’आजचं डाउनलोड करा व गुडघेदुखीच्या त्रासापासून सुटका मिळवा. या उपयुक्त पुस्तकातून आपण गुडघेदुखीवर औषधोपचार करून घेऊ शकाल. या पुस्तिकेत तज्ञ डॉक्टरांनी गुडघेदुखीवरील गुणकारी आयुर्वेदिक औषधांची माहिती दिली आहे.


गुडघेदुखी उपचार मार्गदर्शन पुस्तिका :

यामध्ये खालील माहिती दिली आहे –
• गुडघेदुखी सामान्य माहिती, प्रकार, कारणे, लक्षणे
• ‎गुडघेदुखीवरील प्रभावी औषधे
• ‎गुडघेदुखी पथ्य-अपथ्य
• ‎गुडघेदुखी रुग्णाचा आहार कसा असावा
• ‎गुडघेदुखीचा त्रास होऊ नये म्हणून करावयाच्या उपाययोजना यांची माहिती एकाचं ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांनी ह्या पुस्तिकेमध्ये दिली आहे.

केवळ 50 रुपयांमध्ये हे उपचार पुस्तिका आपण खरेदी करू शकता. डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन पुस्तिका खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. खरेदी केल्यानंतर तात्काळ आपणास पुस्तिका pdf स्वरूपात उपलब्ध होईल.

गुगल पे किंवा PhonePe द्वारेही आपण पेमेंट करू शकता..
यासाठी आमच्या 7498663848 या नंबरवर 50 रुपयांचे पेमेंट करा. त्यानंतर आमच्या 7498663848 या Whatsapp नंबरवर पेमेंट जमा केल्याचे सांगा. उपचार पुस्तिका तात्काळ आपणास whatsapp किंवा ई-मेलवर पाठवुन दिली जाईल.

गुडघेदुखीचा त्रास होऊ नये म्हणून हे करा उपाय..

• वजन वाढू देऊ नका. लठ्ठपणामुळे गुडघ्यासारख्या सांध्यावर अधिक ताण येतो. यासाठी वजन आटोक्यात ठेवावे.
• ‎नियमित व्यायाम व योगासने करावीत. दररोज किमान अर्धा तास चालण्याचा व्यायाम करावा.
• ‎व्यायामामुळे सांधे निरोगी राहतात तसेच वजनही आटोक्यात राहण्यास मदत होते. वजन आटोक्यात राहिल्याने जास्तीचा भार आपल्या गुडघ्यावर येणार नाही.
• ‎लिफ्टचा वापर करण्याऐवजी पायऱ्या चढण्या-उतरण्याची सवय लावून घ्या.
• ‎हाडांची झीज भरुन काढण्यासाठी कॅल्शियमयुक्त आहार सेवन करावा. कॅल्शियमचे हाडांपर्यंत शोषण होण्यासाठी ‘ड’ जीवनसत्वाची गरज असते. त्यासाठी सकाळचे कोवळे सुर्यकिरण अंगावर घ्यावे.
• ‎ गुडघ्याला मार लागणार नाही याची काळजी घ्या.

हे सुद्धा वाचा..
संधीवात माहिती व उपचार
वातरक्त – गाऊटचा त्रास व उपचार
आमवात माहिती, घरगुती उपाय व उपचार
पायात गोळे येणे व त्यावरील उपाय

Gudaghedukhi in marathi, Gudaghe dukhi mahiti karne, lakshne, test, gharguti upay, home remedies, upchar marathi.