संडास मधून रक्त पडणे :
अनेक कारणांमुळे संडास मधून रक्त पडत असते. यातील काही कारणे ही सामन्य तर काही कारणे गंभीरही असू शकतात. जास्त दिवस संडास वाटे रक्त पडत असल्यास त्याचा परिणाम एकूणच आरोग्यावरही होऊन हिमोग्लोबिन कमी होणे, ऍनिमिया यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
संडासात रक्त पडणे याची कारणे :
मुळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, पॉलिप्स, जंताचा त्रास, इन्फेक्शन, अल्सर ह्यासारख्या सामान्य कारणांमुळे संडास मधून रक्त येऊ शकते. तर विविध प्रकारचे कँसर जसे मलाशयाचा कर्करोग, गुदाचा कर्करोग, आतड्याचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, स्वादुपिंडाचा कर्करोग यासारख्या गंभीर कारणांमुळेही संडास वाटे रक्त येऊ शकते.
गुदासंबंधित कारण –
मूळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता यांमुळे गुदभागातून रक्त येऊ शकते. मलत्याग करताना गुदभागी रक्त येते. यामध्ये येणारे रक्त हे लाल रंगाचे असते. मुळव्याधवर उपचार जाणून घ्या..
मोठ्या आतड्यांसंबंधित कारण –
यामध्ये रक्त हे मलाबरोबर मिसळलेले असते. रक्तामुळे अधिक लाल रंग मिसळलेले मल असते. यामध्ये रक्तस्राव अधिक प्रमाणात होऊ शकतो. प्रामुख्याने आतड्याचा कर्करोग, आतड्यातील इन्फेक्शन, जंताचा त्रास या कारणांमुळे रक्त येत असते.
पोट व लहान आतडे संबंधित कारण –
पोट किंवा लहान आतडे यामधून रक्तस्राव होत असल्यास ते रक्त शौचात मिसळत असते. अशाप्रकारामध्ये रक्त मिसळलेले मल हे काळसर रंगाचे दिसत असते. अल्सर, इन्फेक्शन, विविध कँसर यासारखी कारणे यात असू शकतात.
डॉक्टरांकडे केंव्हा जाणे आवश्यक असते..?
- बरेच दिवस संडास मधून रक्त येत असल्यास,
- अधिक प्रमाणात संडास वाटे रक्त पडत असल्यास,
- रक्त पडण्याबरोबरच पोटामध्ये दुखत असल्यास,
- अतिसार, रक्ताची संडास, जुलाब, उलट्या होत असल्यास,
- अशक्तपणा, वजन कमी होत असल्यास,
- गुदाच्या ठिकाणी वेदना होत असल्यास आपल्या डॉक्टरांकडे जाऊन निदान व उपचार करणे आवश्यक असते.
निदान व टेस्ट –
आपले डॉक्टर शारीरिक तपासणी व लॅब टेस्ट याद्वारे होणाऱ्या त्रासाचे निदान करू शकतात. याशिवाय निदानासाठी सिग्मोडीस्कोपी, कोलोनोस्कोपी, वर्चुअल कॉलोनोस्कोपी (सीटी कॉलोनोग्राफी) यांचाही वापर केला जातो.
संडास मध्ये रक्त येणे आणि उपचार :
संडासवाटे रक्त कशामुळे पडत आहे याचे नेमके निदान झाल्यानंतरचं त्यावरील उपचार ठरतात.
संडास मधून रक्त पडणे यावरील उपाय :
मूळव्याध, फिशर किंवा बद्धकोष्ठता यासारख्या कारणांमुळे जर संडासवाटे रक्त येत असल्यास खालील उपाय उपयोगी ठरतात. मात्र याव्यतिरिक्त अन्य कारणांमुळे रक्तस्राव होत असल्यास आपल्या डॉक्टरांकडे जाऊन तात्काळ निदान करणे गरजेचे आहे.
लोणी व खडीसाखर –
मूळव्याधमध्ये गुदातून रक्त पडत असल्यास एक चमचा ताजे लोणी व खडीसाखर मिसळून दिवसातून तीन वेळा खावी.
कांदा –
मूळव्याधमध्ये संडासवाटे रक्त येत असल्यास 30 ग्रॅम कांद्याचा रस व 60 ग्रॅम साखर एकत्र करून ते मिश्रण काही दिवसांसाठी दिवसातून दोनदा घ्यावे.
साजूक तूप –
बद्धकोष्ठताचा त्रास होत असल्यास व त्यामुळे शौचाच्यावेळी रक्त जात असल्यास रोज रात्री झोपण्यापूर्वी एक कप गरम पाण्यात दोन-तीन चमचे साजूक तूप टाकून ते पाणी प्यावे. यामुळे सकाळी बद्धकोष्ठता दूर होऊन पोट साफ होण्यास मदत होईल.
त्रिफळा चूर्ण –
बद्धकोष्ठतेमुळे संडासात रक्त पडत असल्यास गुदभागी त्रास न होता पोट साफ होण्यासाठी त्रिफळा चूर्ण खूप उपयोगी ठरते. अर्धा कप कोमट पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण कालवून ते मिश्रण रोज रात्री झोपण्यापूर्वी घ्यावे. यामुळे सकाळी व्यवस्थित पोट साफ होण्यास मदत होते.
एरंडेल तेल –
पोट साफ न होण्याच्या त्रासावर एरंडेल तेलही उपयुक्त ठरते. यासाठी 5 ml एरंडेल तेल ग्लासभर दुधात मिसळून रोजरात्री झोपण्यापूर्वी प्यावे.
हे सुध्दा वाचा – काळी संडास होण्याची कारणे व उपचार जाणून घ्या..
Read Marathi language article about Blood in stool Causes, Symptoms, Treatment and Home remedies. Last Medically Reviewed on February 28, 2024 By Dr. Satish Upalkar.
Good Morning Sir/madam, My Name is Bhavesh Chaudhary ,i am suffering piles. Currently bleeding a lot for a few days , it is causing a lot of trouble please give me a advice or medicine.