संडासच्या जागेवर आग होणे –
तिखट, मसालेदार पदार्थ अधिक खाण्यामुळे संडासच्या जागी आग होत असते. अशावेळी शौचानंतर गुदभागी भगभग होऊ लागते. तसेच बद्धकोष्ठता, मूळव्याध, फिशर, पोटातील जंत अशा समस्या असल्यास त्यामुळेही संडास करताना आग होऊ लागते. गुदभागी इन्फेक्शन किंवा जखम झाल्याने देखील तेथे आग होत असते.
संडासच्या जागी आग होणे यावर उपाय :
संडासच्या जागी आग होत असल्यास केळे खावे. यामुळे होणारी आग कमी होते.
संडासच्या जागेवर आग होत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम पाण्यात चमचाभर साजूक तूप घालून ते पाणी प्यावे.
पोट साफ न झाल्याने बद्धकोष्ठतेमुळे संडास जागी आग होत असेल तर झोपण्यापूर्वी ग्लासभर गरम पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण मिसळून ते पाणी प्यावे.
तसेच जर गुदभागी इन्फेक्शन किंवा जखम झाल्याने आग होत असल्यास तेथे अँटीबायोटिक क्रीम लावावी.
संडास जागी आग होत असल्यास काय करावे..?
- अशावेळी तिखट, मसालेदार पदार्थ खाणे कमी करावे.
- आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा समावेश करावा.
- दिवसभरात साधारण आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.
- चहा-कॉफीचे प्रमाण कमी करावे.
- तंबाखू, स्मोकिंग, मद्यपान अशा व्यसनांपासून दूर राहावे.
- पोटात जंत झाले असल्यास डॉक्टरांकडून जंतनाशक गोळी घ्यावी. अशी काळजी यावेळी घेतली पाहिजे.
हे सुध्दा वाचा – संडास जागी खाज सुटण्याची कारणे व उपचार जाणून घ्या..
Read Marathi language article about Burning Anus Causes and Home remedies. Last Medically Reviewed on February 28, 2024 By Dr. Satish Upalkar.