नाक वाहणे – Runny Nose :

सर्दी पडसे झाल्यास सतत नाक वाहू लागते. श्वसन मार्ग, नाक व घशामध्ये व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी पडसे होत असते. तसेच थंडी आणि पावसाच्या दिवसात हा त्रास हमखास होत असतो.

नाक वाहत असल्यास जाणवणारी लक्षणे –

सर्दी होणे, सारखे नाक वाहणे आणि शिंका येणे, नाकातून पातळ किंवा घट्ट शेंबूड येणे, नाक चोंदणे, नाकाने श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला येणे, डोकेदुखी, अंगदुखी असे त्रास यावेळी होतात.

नाक वाहणे यावर घरगुती उपाय –

सर्दीमुळे नाक वाहत असल्यास एक कप गरम दूधात एक चमचा हळद घालून ते दूध प्यावे.

आल्याचा बारीक तुकडा चावून खाल्यानेही नाक वाहणे कमी होण्यास मदत होते. तसेच सर्दीमुळे घशाला आलेली सूज आणि खोकलाही यामुळे कमी होतो.

चमचाभर लिंबू रसात दोन चमचे मध घालून ते कोमट पाण्यातून प्यावे. यामुळे सर्दीमुळे नाक वाहणे कमी होते.

काळी मिरी पावडर आणि सुंठीचं मिश्रण मधातून दिवसातून दोन ते तीन वेळा खाल्याने सर्दीमुळे नाक वाहणे कमी होते.

नाक वाहणे यावर हे उपाय उपयोगी पडतात.

हे सुध्दा वाचा – घसा दुखणे यावरील उपाय जाणून घ्या..

Read Marathi language article about Runny nose home remedies. Last Medically Reviewed on February 24, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *