रांजणवाडी घरगुती उपाय – रांजणवाडीसाठी हे करा घरगुती उपाय..

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

रांजणवाडी हा डोळ्यांचा आजार असून तो बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे होत असतो. रांजणवाडीत पापणीच्या कडेला बारीक लालसर फोड येतो. फोड आलेल्या ठिकाणी सूज, वेदना आणि जळजळ होत असते. साधारण एका आठवड्यात हा आजार बरा होत असतो. या article मध्ये रांजणवाडीचे घरगुती उपाय याविषयी माहिती दिली आहे.

रांजणवाडी वर घरगुती उपाय :

एरंडेल तेल –
कापसाचा बोळा एरंडेल तेलात भिजवून तो रांजणवाडीच्या ठिकाणी फिरवावा. या घरगुती उपायाने रांजणवाडीची समस्या दूर होण्यास मदत होते.

लवंग –
लवंगमध्ये अँटीबॅक्टेरिअल गुण असतात. यासाठी लवंग पाण्यात उगाळून त्याचा लेप रांजणवाडीच्या ठिकाणी दिवसातून 2 वेळा लावावा.

धने –
धने एक तास स्वच्छ पाण्यात भिजवत ठेवावेत. त्यानंतर ते पाणी गाळून घ्यावे. ह्या गाळलेल्या धन्याच्या पाण्याने आपले डोळे धुवावेत. या घरगुती उपायाने रांजणवाडीतील सूज व वेदना कमी होण्यास मदत होते.

कोरपडीचा गर –
कोरपडीचा गर रांजणवाडीच्या ठिकाणी लावावा. यामुळेही सूज व वेदना कमी होण्यास मदत होते. 

पेरूची पाने –
रांजणवाडीमुळे होणारी वेदना आणि जळजळ कमी करण्यासाठी पेरूची पाने खूप उपयोगी पडतात. यासाठी गरम पाण्यात पेरूची पाने भिजवून ती आपल्या डोळ्यावर 10 मिनिटे ठेवावीत.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

लसूण –
लसणाची पाकळी सोलून त्याचा तुकडा करून ती रांजणवाडीवर लावावी. यामुळे रांजणवाडी कमी होण्यास मदत होते. लसूण खाण्यामुळे होणारे फायदेही वाचा..

रांजणवाडीमध्ये कोणती काळजी घ्यावी..?

रांजणवाडीची फोडी बोटाने किंवा नखाने दाबून फोडू नये. कारण असे करण्यामुळे त्याठिकाणी जखम होऊ शकते तसेच तेथील बॅक्टेरियल इन्फेक्शन इतर ठिकाणीही पसरण्याची व त्रास अधिक वाढण्याची शक्यता असते.

Ranjanwadi eye disease home remedies in Marathi.