तुम्ही प्रेग्नंट आहात हे कसे ओळखाल..?
गर्भधारणा झाल्याचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे ‘पाळी चुकणे’ हे असते. स्त्रीची मासिक पाळी नियमित असताना जर दहा किंवा त्याहीपेक्षा जास्त दिवस होऊनही पाळी न आल्यास ती गर्भवती आहे असं अनुमान काढलं जातं; पण या गोष्टीलाही अपवाद आहेत.
काहीवेळा गर्भावस्था नसतानाही पाळी बंद होऊ शकते. तसंच काही स्त्रियांना दिवस राहूनही पाळीच्या दिवसांत रक्तस्राव होऊ शकतो. मग असे असताना गर्भधारणा झाली आहे की नाही हे कसे समजावे असा अनेक स्त्रियांचा प्रश्न असतो. यासाठी येथे गर्भधारणा झाली आहे की नाही हे कसे ओळखावे याविषयी माहिती दिली आहे.
संबंधानंतर किती दिवसात गर्भधारणा होते..?
संबंधानंतर काही मिनिटांपासून ते 5 दिवसापर्यंत स्त्रीबीज आणि पुबीज यांचे मिलन होऊन फर्टिलाईजेशन होते. त्यानंतर 6 ते 15 दिवसांपर्यंत मिलनातून फर्टिलाईज झालेले अंडे हे गर्भाशयात रुजण्याची प्रक्रिया (Implantation) सुरू होते व तेंव्हा गर्भधारणा होत असते. म्हणजे संबंधानंतर साधारण 6 ते 15 दिवसात स्त्री गर्भवती होत असते.
स्त्री गरोदर आहे की नाही हे कसे ओळखावे..?
साधारणपणे संबंधानंतर 6 ते 15 दिवसांपर्यंत ती स्त्री गरोदर होऊ शकते. गर्भधारणा होत असताना सुरवातीला काही लक्षणे जाणवणारसुद्धा नाहीत. त्यामुळे लक्षणांवरून गरोदर आहे की नाही हे ओळखणे अवघड असते. मात्र जर काही दिवसांनी प्रेग्नन्सी टेस्ट, ब्लड टेस्ट किंवा सोनोग्राफी करून ती स्त्री गरोदर आहे की नाही ते समजू शकते.
गर्भधारणा झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी घरच्याघरी प्रेग्नन्सी टेस्ट करता येते. औषधांच्या दुकानात ही टेस्ट करण्याचे ‘Pregnancy test Kit’ हे साहित्य सहज मिळू शकते. मात्र प्रेग्नन्सी टेस्टचा रिझल्ट अचूक येण्यासाठी ती टेस्ट योग्य वेळीचं करावी लागते.
प्रेग्नन्सी टेस्ट कधी करावी..?
मासिक पाळी चुकल्यानंतर, एक आठवड्याने प्रेग्नन्सी टेस्ट केल्यास गरोदर आहे की नाही याचे अगदी खात्रीशीर निदान होते. आणि जर तुम्ही एवढा वेळ वाट पाहू इच्छित नसाल तर, संबंधानंतर एक ते दोन आठवड्यानी प्रेग्नन्सी टेस्ट करू शकता. मात्र त्याच्या रिझल्टची अचुकचा सांगता येणार नाही. येथे क्लिक करा व प्रेग्नन्सी टेस्ट कशी करावी ते जाणून घ्या..
प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.
प्रेग्नन्सी टेस्ट प्रमाणेच ब्लड टेस्ट करून रक्तातील हार्मोन्सचे प्रमाण (Serum BHCG) तपासून गरोदर आहे की नाही हे ओळखता येते. ही ब्लड टेस्टसुद्धा मासिक पाळी चुकल्यानंतर, एक आठवड्याने किंवा संबंधानंतर एक ते दोन आठवड्यानी करता येते. याशिवाय सोनोग्राफी तपासणी करूनही खात्रीशीररित्या गरोदर आहे की नाही ते समजू शकते.
प्रेग्नंट आहे की नाही हे लक्षणांवरून कसे ओळखायचे..?
सर्वसाधारणपणे गर्भारपणाच्या सुरुवातीला पुढील काही लक्षणे आढळू शकतात. त्यायोगे गरोदर असल्याचे कळू शकते. मात्र ही लक्षणे जाणवण्यासाठी 2 ते 3 आठवडे जाणे आवश्यक असते.
1) मासिक पाळी न येणे,
2) स्तन दुखू लागणे, स्तन जड व सुजल्यासारखे वाटणे,
3) मळमळणे व उलट्या होणे,
4) थकवा व अशक्तपणा जाणवणे,
5) पोट फुगल्यासारखं किंवा गच्च वाटणे,
6) सारखे-सारखे लघवीला होणे,
7) अंग गरम झाल्यासारखे वाटणे,
8) चिडचिडेपणा वाढणे, मूड सतत बदलत राहणे.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास येथे क्लिक करून आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल जरूर Subscribe करा.