गर्भावस्थेत पहिल्या महिन्यात ओटीपोटात वेदना होण्याची कारणे :
गरोदरपणात स्त्रीच्या गर्भाशयात सुरवातीला गर्भाची वाढ होत असल्याने, गर्भाशयाचे स्नायु खेचले जातात त्यामुळे ओटीपोटात दुखत असते. गर्भाशयाच्या आकारात होत असलेली वाढ, त्यामुळे स्नायूंवर येणारा ताण यांमुळे गर्भाशय, योनिमार्ग व ओटीपोटातील इतर अवयव यांकडे खूपच जास्त प्रमाणात रक्तपुरवठा होत असतो. याशिवाय बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, पोटात गोळा येणे यामुळेही प्रेग्नन्सीमध्ये पहिल्या महिन्यात स्त्रीच्या ओटीपोटात दुखत असते.
मासिक पाळीच्या वेळी ज्याप्रमाणे ओटीपोटात दुखत असते त्याचप्रमाणे त्रास यावेळीही होत असतो. त्यामुळे मासिक पाळी तर सुरू होणार नाही ना? किंवा दर महिन्याला जसे दुखते तसेच आज दुखत आहे, मी गरोदर आहे की नाही? वैगेरे प्रश्न अनेक जणींना यावेळी पडू शकतात. मात्र अशावेळी काळजी करू नका कारण, प्रेग्नन्सीत गर्भवतीच्या ओटीपोटात दुखणे ही एक सामान्य बाब आहे.
प्रेग्नन्सीमध्ये ओटीपोटात दुखत असल्यास हे करा उपाय :
• गरोदरपणात ओटीपोटात दुखत असल्यास थोडी विश्रांती घ्यावी.
• ज्या बाजूला दुखत असेल त्याच्या विरुद्ध बाजूवर झोपून आराम करावा.
• गरम पाण्याने अंघोळ केल्यानेही त्रास कमी होण्यास मदत होते.
• दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.
• उपाशी राहू नये. वरचेवर थोडा थोडा आहार घेत राहावा.
• पोट नियमित साफ होईल यासाठी संतुलित व फायबर्सयुक्त आहार घ्यावा.
• लघवीला वेळच्यावेळी जावे. लघवी अधिककाळ थांबवून ठेऊ नये.
• एकाच ठिकाणी अधिकवेळ बसणे किंवा उभे राहणे टाळावे.
गरोदरपणात ओटीपोटात दुखू लागल्यास डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक असते..?
प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.
अधिक तीव्रतेने ओटीपोटात दुखत असल्यास, योनीतुन रक्तस्त्राव किंवा पाणी जात असल्यास, उलट्या होत असल्यास आपल्या स्त्रीरोगतज्ञांचा तात्काळ सल्ला घेणे आवश्यक आहे.
Abdominal Cramping & Stomach pain During first month of Pregnancy information in Marathi.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास येथे क्लिक करून आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल जरूर Subscribe करा.