गरोदरपणात पहिल्या महिन्यात जाणवणारी लक्षणे

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

One month of pregnancy symptoms in Marathi.

गरोदरपणाचा पहिला महिना हा साधारण शेवटच्या मासिक पाळीनंतर तीन आठवडयांनी सुरू होतो. पहिल्या महिन्यात 5 आठवड्यानंतर गरोदर स्त्रीमध्ये शारीरिक बदल जाणवू लागतात. गर्भारपणाच्या या सुरवातीच्या दिवसांत स्त्रीच्या शरीरात होणारे बदल आणि या बदलांमुळे जाणवणारी लक्षणे यांची माहिती येथे दिली आहे.

पहिल्या महिन्यात गर्भनिर्मिती व गर्भस्थापना होत असते. गर्भ हा पहिल्या 3 महिन्यात अस्थिर स्वरूपात असून गर्भपात (miscarriage) होण्याचा धोका जास्त असतो. यासाठी पहिल्या तीन महिन्यात योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते. मात्र बऱ्याचदा, गर्भावस्थेचा पहिला महिना समजूनच येत नाही.

गरोदर पहिला महिना लक्षणे :

• मासिक पाळी न येणे,
• आळस येणे व अंग जड वाटणे,
• थकवा येणे,
• वारंवार लघवीला होणे,
• तोंडात सतत लाळ येणे,
• मळमळ होणे,
• अन्न खाण्याची इच्छा न होणे,
• मूड बदलणे,
• पोटफुगी, पोट साफ न होणे (बद्धकोष्ठता),
• ओटीपोटात दुखणे,
• गरोदरणाची पहिलीच वेळ असल्यास स्तनांचे Nipples काळपट होणे,
• पायांवर अल्प प्रमाणात सूज येणे,
• पायात पेटके येणे, कंबरदुखी
• आंबट खाण्याची इच्छा असणे यासारखी लक्षणे पहिल्या महिन्यात गर्भवतीमध्ये जाणवू शकतात.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

गर्भारपणाचे निदान कधी करावे..?

वरील लक्षणे सर्वच स्त्रियांमध्ये जाणवतील असेही नसते. त्यामुळे एखादी स्त्री गरोदर असल्याची निश्चिती पहिल्या महिन्यात ‘लक्षणांवरून’ होणे थोडे अवघड असते. मात्र पहिल्या महिन्याच्या शेवटी किंवा दुसऱ्या महिन्यात, गरोदर असल्याचे निश्चित निदान करता येते.

गर्भारपणाचे निदान करण्यासाठी पहिला महिना संपताना, गरोदर असल्याच्या निश्चित निदानासाठी Urine Pregnancy Test किंवा BHCG ही रक्तातील तपासणी केली जाते. मासिक पाळी चुकल्यानंतर 1 ते 2 दिवसांत घरच्याघरी प्रेग्नन्सी टेस्ट करता येते. औषधांच्या दुकानात यासाठीची ‘प्रेग्नन्सी टेस्ट किट’ उपलब्ध असते. प्रेग्नन्सी टेस्टचा वापर कसा करावा याविषयी माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा.

1st month pregnancy symptoms in marathi.