गर्भवती महिला माहिती :

गर्भावस्थेमुळे गर्भवती स्त्रीमध्ये अनेक शारीरिक बदल जाणवू लागतात. गर्भावस्थेच्या सुरवातीच्या दिवसांत गर्भवतीमध्ये होणारे बदल आणि या बदलांमुळे जाणवणारी गर्भवतीची लक्षणे याविषयी माहिती येथे दिली आहे.

स्त्री गर्भवती असल्याची ही आहेत लक्षणे..

• नियमित येणारी मासिक पाळी येणे थांबणे,
• आळस येणे, मड बदलत राहणे,
• अंग जड वाटणे,
• थकवा येणे,
• वारंवार लघवीला होणे,
• मळमळ व उलट्या होणे,
• अन्न खाण्याची इच्छा न होणे,
• पोटफुगी, छातीत जळजळ होणे, पोट साफ न होणे (बद्धकोष्ठता),
• ओटीपोटात दुखणे,
• स्तनांमध्ये सूज व वेदना होणे,
• निप्पलचा रंग अधिक काळपट होणे,
• पायांवर काही प्रमाणात सूज येणे,
• पायात पेटके येणे, कंबरदुखी
यासारखी लक्षणे सुरवातीला गर्भवतीमध्ये जाणवू शकतात.

वरील काही लक्षणे जाणवत असल्यास गर्भधारणा चाचणीद्वारे गर्भवती आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. घरच्याघरी गर्भधारणा चाचणी कशी करावी याविषयी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...