गर्भधारणा चाचणी (Pregnancy test) :
आपण गरोदर आहात की नाही हे तपासण्यासाठी गर्भधारणा चाचणी म्हणजे प्रेग्नेंसी टेस्ट करणे खूप उपयोगी ठरते. गर्भारपणाचे निदान लघवीच्या साध्या चाचणीवरून करता येते. यासाठी मेडिकलमध्ये ‘प्रेग्नन्सी टेस्ट किट्स’ सहज उपलब्ध असतात. त्या किटचा वापर करून घरातही प्रेग्नन्सी टेस्ट करता येते. या सोप्या टेस्ट मुळे प्रेग्नन्सी कन्फर्म करण्यासाठी खूप मदत होते.
गरोदरपणाची सुरवात झाल्यावर निर्माण झलेला गर्भ हा ह्यूमन कोरिओनिक गोनाडोट्रोपिन हार्मोन्सची (HCG hormones) निर्मिती करतो. जर तुम्ही गर्भवती असल्यास HCG हार्मोन हे तुमच्या लघवीमध्ये आढळू लागते. त्यामुळे अशावेळी प्रेग्नन्सी टेस्ट किटद्वारे लघवीची तपासणी करून प्रेग्नंट आहे की नाही ते ठरवता येते. प्रेगनेंसी टेस्ट कशी करायची याची माहिती खाली दिली आहे.
प्रेग्नेंसी टेस्ट किट :
प्रेग्नन्सी टेस्ट किटसंबंधी माहिती आपण जाहिरात किंवा अन्य ठिकाणी पाहिली असेल. गरोदर असल्याचे किंवा नसल्याचे अचूक निदान या प्रेग्नन्सी टेस्ट किटद्वारे केवळ 5 मिनिटात करता येते. मेडिकल स्टोअरवर प्रेग्नन्सी टेस्ट किट विकत मिळते. ती घेऊन त्यावरील सर्व सूचना वाचून घ्याव्यात. महत्वाची सूचना म्हणजे प्रेग्नन्सी टेस्ट ही सकाळच्या वेळीच करावी. कारण सकाळच्या वेळी HCG हे हार्मोन मुत्रामध्ये स्पष्ट आढळते. यामुळे गरोदर चाचणीचा निकाल अधिक अचूक मिळणे शक्य असते.
प्रेग्नेंसी टेस्ट किती दिवसांनी करावी..?
मासिक पाळी चुकल्यानंतर 1 किंवा 2 आठवड्याने टेस्ट केल्यास गरोदर आहे की नाही हे कळण्यास मदत होऊ शकते. तर संबंधानंतर 8 ते 15 दिवसांनी प्रेग्नन्सी टेस्ट करून गरोदर आहे की नाही ते समजू शकते.
प्रेग्नन्सी टेस्ट कधी व कशी करावी..?
प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठी टेस्ट पट्टीवर आपल्या मूत्राचे काही थेंब ड्रॉपरने टाकावे. त्यानंतर जर लघवीमध्ये HCG हार्मोन्सचे प्रमाण असल्यास पट्टीवरील दोन्ही रेषांचा रंग वेगळा म्हणजे हलका किंवा गडद गुलाबी (Pink Color) झाल्यास गरोदर असल्याचे निदान होते. याला Pregnancy test Positive असे म्हणतात.
आणि जर पट्टीवरील रंगामध्ये कोणताही बदल न झाल्यास किंवा दोनपैकी केवळ एकच रेष पिंक कलरची झाल्यास गरोदर नसल्याचे निदान होते याला Pregnancy test Negative असे म्हणतात.
प्रेग्नन्सी टेस्ट किटचे प्रकार :
प्रेग्नन्सी टेस्ट किट ही स्ट्रीप प्रेग्नन्सी टेस्ट आणि कप प्रेग्नन्सी टेस्ट अशी दोन प्रकारची असते.
1) स्ट्रीप प्रेग्नन्सी टेस्ट –
यामध्ये लघवीच्या धारेमध्ये एक विशिष्ट पट्टी धरावी लागते. HCG हार्मोन्स असल्यास त्यावरील रेषांचा रंग बदलतो. सामान्यतः या चाचणीतुन प्रेग्नंट आहे की नाही हे कळण्यासाठी पाच-सात मिनिटे लागतात. स्ट्रीप प्रेग्नन्सी टेस्टचा वापर अधिक प्रमाणात केला जातो.
2) कप प्रेग्नन्सी टेस्ट –
यासाठी एका कपामध्ये लघवीचा नमुना घ्यावा लागतो आणि त्यानंतर टेस्टचे साधन कपमध्ये बुडवावे लागेल. जर HCG हार्मोन्स असल्यास त्यावरील रंग बदलतो व प्रेग्नंट असल्याचे निदान होते.
घरात करण्याजोग्या अन्य काही सोप्या प्रेग्नन्सी टेस्ट करता येतात का..?
टुथपेस्ट, साबण, साखर इत्यादी पदार्थ वापरून प्रेग्नन्सी टेस्ट करता येऊ शकते मात्र त्यांच्या अचूक निदानाविषयी खात्री देता येत नाही. अचूक निदानासाठी प्रेग्नन्सी टेस्ट किट किंवा आपल्या डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी लागेल.
हे सुद्धा वाचा – गरोदरपणात सुरवातीला कोणती लक्षणे असतात ते जाणून घ्या..
गरोदर आहे की नाही ते ठरवण्यासाठी डॉक्टर खालील तपासणी करतात :
1) यूरिन टेस्ट –
लॅबमध्ये लघवीची तपासणी करून गर्भधारणा झाली आहे की नाही ते तपासले जाते.
2) ब्लड टेस्ट –
रक्त तपासणी करून गरोदर आहे की नाही याचे निदान केले जाते. यामध्ये रक्तातील बिटा एचसीजी हे हार्मोन तपासून गर्भावस्थेचे निदान होऊ शकते.
3) अल्ट्रासाउंड सोनोग्राफी –
अल्ट्रासाउंड सोनोग्राफीमध्ये गरोदर असल्यास गर्भाशयातील गर्भाची स्थिती कॉम्प्युटर स्क्रीनवर कळण्यास मदत होते. यामध्ये गर्भाशयात वाढणारा गर्भ नक्की किती आठवड्यांचा झालेला आहे, हे समजू शकते. याशिवाय गरोदर आहे की नाही हे क्लिनिकमध्ये डॉक्टर शारीरिक तपासणी करून निदान करतात.
हे सुद्धा वाचा..
गरोदरपणातील लक्षणे
गर्भावस्थेतील आहार
गर्भावस्थेत करावयाच्या तपासण्या
Read Marathi language article about Pregnancy test. Last Medically Reviewed on February 17, 2024 By Dr. Satish Upalkar.
खूप छान माहिती
धन्यवाद