Dr. Satish Upalkar’s article about Tips for healthy kidney in Marathi.
आरोग्य किडनीचे :
सध्या अनेक लोक हे डायबेटिस आणि उच्च रक्तदाबाच्या विकारांनी ग्रस्त आहेत. त्यामुळे किडनी विकारांचा धोकाही वाढला आहे. भारतात दरवर्षी सुमारे 2.5 लाख जणांची किडनी फेल होते तर सध्या देशात सुमारे 15 लाख किडनीचे रूग्ण आहेत. या सर्वांना डायलिसिसची गरज आहे. त्याचा खर्चही सामान्यांना न परवडणारा आहे.
त्यामुळं किडनीचा आजार होवू न देण्यासाठी प्रयत्नशील राहणं हेच कधीही चांगलं आहे. किडनी फेल झाल्यानंतर डायलिसिस किंवा किडनी ट्रांसप्लांट असे दोनच उपाय आहेत. हे दोन्ही उपाय न केल्यास मृत्यू निश्चित आहे. त्यामुळं आपली किडनी निरोगी कशी राहील हे पाहणं सर्वात महत्त्वाचं आहे. किडनीची काळजी कशी घ्यावी याची माहिती खाली दिली आहे. (Tips for healthy kidney in Marathi)
किडनी खराब होण्याचा धोका कुणाला..?
- मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांमध्ये किडनी फेल होण्याची सर्वाधिक शक्यता असते. त्यामुळं शुगर आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवणं सर्वाधिक गरजेचे आहे.
- त्याशिवाय मुतखड्याचा (किडनी स्टोनचा) त्रास असणाऱ्यांनीही विशेष काळजी घेणं गरजेचे आहे.
- रासायनिक खते, किटकनाशके युक्त आहारामुळे आपल्या किडनीवर घातक परिणाम होतो.
- मद्यपान, धुम्रपान व्यसन करणाऱ्यांनाही किडनी फेल होण्याचा धोका अधिक असतो.
- तसेचं वेदनाशामक अौषधांचा अतिवापर किडनीसाठी धोकादायक आहे.
किडनीची काळजी कशी घ्यावी..?
- भरपूर पाणी प्यावे. दिवसातून किमान 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक.
- लघवीला झाल्यास त्वरित लघवीस जावे. लघवीला होऊनही लघवी थांबवुन ठेवल्याने मुत्राशय, किडनीवर प्रचंड ताण येतो. याचा वाईट परिणाम किडणीच्या कार्यावर होतो.
- किडनीचा आजार टाळण्यासाठी मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या रूग्णांनी वर्षातून एकदा किडनी चेक करून घेणं गरजेचे आहे.
- पौष्टिक अन्नपदार्थांचे सेवन करा. कुळथीचे आमटी आहारात घवी, शहाळाचे पाणी प्यावे.
- आहारातील मिठाचे प्रमाण कमी करा. दररोज 4 ग्रॅम पेक्षा जास्त मीठ खाऊ नका. आहारातील मिठावर लक्ष ठेवाचं शिवाय वेफर्स, स्नॅक्स, बिस्किटे, वडापाव यातील मिठावर (सोडिअमवर) लक्षसुद्धा ठेवा.
- सेंद्रिय शेतीतून पिकलेला भाजीपाला खाण्यास प्राधान्य द्या. कोबी, फ्लॉवर खाणे टाळा. फळे-भाजीपाला स्वच्छ धुवूुनचं मग खावीत. कारण ह्यांवर भरपूर प्रमाणात किटकनाशके फवारतात.
- डॉक्टरांच्या सल्याशिवाय परस्पर वेदनाशामक अौषधे (पेनकिलर्स) घेणे टाळा.
- आणि हेल्थ चेकअप वेळी आपल्या किडनीचीही तपासणी करून घ्या.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
किडनी विकारासंबंधीत खालील उपयुक्त माहितीसुद्धा वाचा..
- किडनी फेल्युअर आजाराची मराठीत संपूर्ण माहिती
- किडनी स्टोन्स किंवा मुतखड्याचा त्रास व उपाय
- मधुमेह (डायबेटीस) मराठीत माहिती
- हाय ब्लडप्रेशर कारणे, लक्षणे आणि उपाय
Prevent tips for precautions to avoid kidney failure in Marathi.