बाळंतपणात पोट बांधणे :
डिलिव्हरीनंतर कंबरपट्टा किंवा पोटपट्टा वापरू शकतो का याविषयी अनेक स्त्रियांचा प्रश्न असतो. गरोदरपणात वाढलेले पोट योग्य आकारात येण्यासाठी कंबरपट्टा वापरून पोट बांधणे उपयोगी असते. असे असले तरीही काही काळजी घेणे आवश्यक असते.
प्रसूतीनंतर पोटपट्टा बांधण्याचे फायदे :
- प्रसूतीनंतर काही दिवस कंबरपट्टा बांधण्यामुळे पोटाचे स्नायू पूर्व आकारात येण्यास मदत होते.
- पोट बांधण्यामुळे पोटाचे ढिले पडलेले स्नायू मजबूत होण्यास मदत होते.
- गरोदरपणात वाढलेला पोटाचा आकार कमी होऊन पूर्वरत करण्यास मदत होते.
- पोटावरची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
बाळंतपणात कंबरपट्टा कसा वापरावा..?
- कंबरपट्टा जास्त आवळून बांधू नये.
- मेडिकल स्टोअरवर आपणास कंबरपट्टा विकत मिळू शकतो.
- बाजारात उपलब्ध न झाल्यास सुती कापडाची पातळ चारपदरी घडी करून वापरू शकता.
- प्रसूतीनंतर सव्वा महिना कंबरपट्टा वापरावा.
कंबरपट्टा बांधताना कोणती काळजी घ्यावी..?
कंबरपट्टा जास्त आवळून घट्ट बांधू नये. जास्त घट्ट बांधल्यास यामुळे पोटात वेदना होऊ शकतात. तसेच जास्त आवळून कंबरपट्टा बांधल्याने जास्त प्रमाणात योनीतुन रक्तस्राव होऊ शकतो.
सिझेरियन डिलिव्हरी झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पोटपट्टा बांधू नये. कारण सिझेरियन झाले असल्यास पोटावर टाके असतात. अशावेळी कंबरपट्टा वापरल्यास टाके असलेल्या ठिकाणी दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे सिजर झाल्यास पोटपट्टा वापरणे टाळावे किंवा आपल्या डॉक्टरांचा याविषयी सल्ला घ्यावा.
हे सुध्दा वाचा..
- बाळंतपणानंतर घ्यायची काळजी
- बाळंतपणातील आहार
- सिझेरियन झाल्यानंतर घ्यायची काळजी
- बाळंतपणानंतर करायचा व्यायाम
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
In this article information about Postpartum Belt After delivery information in Marathi. language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).
प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.