Polycystic Ovarian Syndrome (PCOS, PCOD) Symptoms, Causes & Treatment in Marathi.

स्त्रियांमधील PCOS किंवा PCOD समस्या म्हणजे काय..?

‘पीसीओएस’ ही एक जेनेटिक आणि हार्मोनल असंतुलनामुळे निर्माण होणारी समस्या आहे. या आजाराला पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोम (PCOS किंवा PCOD) असे म्हटले जाते. स्त्रियांमध्ये दोन बीजांडकोष (ovaries) असतात व ते गर्भाशयाला जोडलेले असतात. दर महिन्याला बीजांडकोष हे एक परिपक्व स्त्रीबीज निर्माण करते व त्याचबरोबर इस्ट्रोजेन, प्रोजेस्टरॉन व ऍन्ड्रोजेन या हार्मोनल अंतःस्रावांची निर्मितीसुद्धा करते.

मात्र ‘पीसीओएस’ मध्ये नेहमीच्या बीजांडकोषापेक्षा (नॉर्मल ओव्हरीजपेक्षा) वेगळया अशा अनेक छोट्या-छोट्या सिस्ट (गाठी) असलेले बीजांडकोष अर्थात पॉलिसिस्टिक ओव्हरीज असतात. या पॉलिसिस्टिक ओव्हरीज गर्भधारणेसाठी लागणारे परिपक्व स्त्रीबीज त्या नियमितपणे निर्माण करू शकत नाहीत. अल्ट्रा सोनोग्राफी (यूएसजी) द्वारे नॉर्मल ओव्हरीज किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहे की नाही हे निश्र्चित करता येते.

PCOS किंवा PCOD मुळे गर्भधारणेसाठी आवश्यक असणारे परिपक्व स्त्रीबीज तयार होऊ शकत नाही. त्यामुळे, एक तर स्त्रीयांमध्ये वंध्यत्वाची समस्या निर्माण होते किंवा संबंधित स्त्री गरोदर राहिल्यास तिला गर्भपाताचा धोका अधिक असतो. बदललेली जीवनशैली, खानपान तसेच जनुकीय बदलांमुळे मासिक पाळी अनियमित होत असल्याने महिलांमध्ये वंध्यत्व आणि गर्भपाताचे प्रमाण वाढू लागले आहे. साधारणत: 18 वर्षांच्या तरुणीपासून 44 वर्षांच्या महिलेपर्यंत ‘पीसीओएस’चा त्रास होऊ शकतो. दर 10 महिलांपैकी एका महिलेस हा त्रास आढळतो. पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (PCOS किंवा PCOD) हा रोग बरा होत नाही; परंतु त्यावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येते किंवा यावर तात्पुरता इलाज केला जातो. ज्या महिलांच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला मधुमेह, पीसीओएस किंवा स्थूलतेचा त्रास असेल तर पुढील पिढीलाही अनुवंशिकतेतून हा आजार होऊ शकतो.

वंध्यत्व म्हणजे गर्भधारणा होण्यास (मुल-बाळ होण्यास) अडथळा होणे. ‘पीसीओएस’ हे सध्याच्या काळात वंध्यत्वाचे एक सर्वाधिक प्रमुख कारण बनले आहे. ‘पीसीओएस’ असलेल्या महिलांमध्ये मासिक पाळीची अनियमितता किंवा ती न येणे हे बहुतेक वेळा ओव्हुलेशन न होण्याशी संबंधित आहे (अंडाशयात अंडी तयार होणे आणि ती मुक्त होणे), ज्यामुळे गर्भधारणा होण्याची किंवा गरोदर राहण्याची शक्यता कमी होते. तुम्हाला गर्भधारणा होण्यास त्रास होत असल्यास, आपल्या स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घ्या. कारण तुम्हास ‘पीसीओएस’ असू शकतो.

प्रेग्नन्सी पुस्तक डाऊनलोड करा..
'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पासून ते बाळाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती दिली आहे. 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

पीसीओएसची कारणे काय आहेत..?

PCOS, PCOD Causes in Marathi
• ‘पीसीओएस’ ही एक जेनेटिक कारक आणि हार्मोनल असंतुलनामुळे होणारी समस्या आहे.
• ‎बदललेली जीवनशैली – आरोग्यास अपायकारक असलेले जंकफुड, तळलेले पदार्थ अधिक खाणे आणि व्यायाम न करणे यामुळे महिलांचे वजन वाढते. लठ्ठपणा किंवा वजन वाढण्यामुळे संप्रेरकांचा असमतोल होतो ज्यामुळे तुमच्या मासिक पाळीवर परिणाम होतो. परीणामी ‘पीसीओएस’ ची समस्या निर्माण होते.
• ‎अनुवंशिक कारक – एखाद्या महिलेची आई, मावशी किंवा बहिणीला ‘पीसीओएस’ असल्यास/झाला असल्यास तिला तो होण्याची अधिक शक्यता असते.

‘पीसीओएस’ ची लक्षणे :

PCOS, PCOD Symptoms in Marathi
• अनियमित मासिक पाळी हे या आजाराचे प्रमुख लक्षण आहे.
• ‎पुरळ/मुरूमे आणि हर्सुटिजम यामध्ये मुख्यत: चेहऱ्यावर किंवा शरीरावर अनावश्यक केसांची जास्त वाढ होते.
• वजण जास्त वाढणे, मधुमेह होणे,
• ‎सातत्याने गर्भपात होणे, वंधत्व समस्या उद्भवणे ही लक्षणे असतात

‘पीसीओएस’ चे वेळीचं निदान होणे महत्वाचं..

या आजारामुळे महिलांमध्ये वंधत्वासोबत गर्भपाताचीही दाट शक्यता असते. बहुतेक वेळा पुरळ/मुरूमे आणि हर्सुटिजम ह्यासारख्या दिसून येणाऱ्या लक्षणांवरून चुकीचे रोगनिदान केले जाते किंवा कॉस्मेटॉलॉजिकल बाबी म्हणून स्वत:च रोगनिदान केले जाते.
मोठ्या प्रमाणात महिलांना त्यांच्या मासिक चक्राच्या समस्या झाल्याखेरीज किंवा त्यांना गर्भधारणा होण्यात अडचणी येईपर्यंत त्यांना ‘पीसीओएस’ झाला आहे हे माहित किंवा समजत देखील नाही.

अनियमित मासिक पाळी, स्थुलता, वंधत्व, सातत्याने गर्भपात आणि मधुमेह हे ‘पीसीओएस’ या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. ही लक्षणे आढळून आल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन वेळेवर उपचार घेणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा हा आजार बळावण्याची शक्यता असते. योग्य उपचाराने ‘पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोम’ या आजारावर नियत्रंण मिळवता येते. पण, तो पूर्णपणे बरा होत नाही. शिवाय, याकडे दुर्लक्ष केल्यास वाढत्या वयासोबत उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच गर्भाशयाचा कर्करोग होण्याची भीती असते. त्यामुळे, महिलांनी नियमित डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

PCOS किंवा PCOD होऊ नये म्हणून हे करा उपाय..

PCOS, PCOD Prevention in Marathi
‘पीसीओएस’ ची लक्षणे आटोक्यात ठेवण्यासाठी खालील गोष्टी पाळा,
• वजन नियंत्रणात ठेवा, नियमित व्यायाम आणि योगासने करावीत.
• ‎फास्टफूड, तळलेले, मैदायुक्त पदार्थ टाळावेत.
• ‎पाणी भरपूर प्यावे. दिवसातून किमान 8 ग्लास पाणी प्या.
• ‎नियमित आपल्या डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करून घ्या.

PCOS उपचार मराठी माहिती :

PCOS, PCOD Treatments in Marathi
पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोमच्या विविध समस्यांवर तसेच वंध्यत्व निवारणासाठी औषधी गोळ्या व हॉर्मोन्सच्या इंजेक्‍शनद्वारे तसेचं व्हिडिओ लॅपरोस्कोपीच्या साह्याने पॉलिसिस्टिक ओव्हरीजवर शस्त्रक्रियासुद्धा केली जाते.

वंध्यत्व संबंधित खालील माहितीही वाचा..
स्त्री वंध्यत्व कारणे व उपचार
पुरुष वंध्यत्व कारणे व उपचार
वंध्यत्व निवारण आधुनिक उपचार
टेस्ट ट्यूब बेबी – IVF मराठीत माहिती
वंध्यत्व तपासणी कशी करतात