गर्भावस्थेतील मुळव्याध (Piles) :
गरोदरपणात मूळव्याध होण्याची समस्या अनेक स्त्रियांना असते. कारण प्रेग्नन्सीमध्ये बद्धकोष्ठता किंवा शौचास साफ न होण्यामुळे मलाचा खडा धरत असतो. शौचावेळी जास्त जोर लावल्याने मूळव्याध (piles) होऊ शकते. याशिवाय प्रेग्नन्सीमध्ये गुदाच्या शिरांना सूज येऊ शकते तसेच प्रसूतीच्या वेळी जास्त जोर लावल्याने किंवा गुदाच्या ठिकाणी जखम झाल्याने मुळव्याधचा त्रास होत असतो.
मूळव्याधची लक्षणे :
गुदाच्या ठिकाणच्या शिरा सुजतात, तेथे वेदना होत असते. त्याठिकाणी मुळव्याध कोंब येणे, खाज येणे, आग होणे व काहीवेळा रक्त जाणे अशी लक्षणे मुळव्याधमध्ये असतात.
गरोदरपणात मुळव्याध होऊ नये यासाठी अशी घ्यावी काळजी :
योग्य आहार घ्या..
आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश असावा. यासाठी हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, फळे, धान्ये व मोड आलेली कडधान्ये यांचा समावेश करावा. दिवसभरात वरचेवर 8 ग्लास पाणी प्यावे. तिखट, मसालेदार, तेलकट, खारट व पचनास जड असणारे पदार्थ वारंवार खाणे टाळावे.
शौचाच्यावेळी काळजी घ्या..
संडासला झाल्यास लगेच जाऊन यावे. अधिकवेळ टॉयलेट सीटवर बसने टाळावे. शौचाच्याठिकाणी खाज किंवा आग होत असल्यास तेथे खाजवणे टाळावे.
कीगल व्यायाम करावा..
प्रेग्नन्सीमध्ये दररोज गुदभागाचा कीगल व्यायाम करावा. यासाठी बसलेल्या ठिकाणी गुदाच्या स्नायू सैल सोडावेत त्यानंतर ते काही वेळ ताणून ठेवावेत. पुन्हा ते सैल सोडून ताणून ठेवावेत. असा दिवसातून 2 वेळा व्यायाम करावा.
गरोदरपणात मुळव्याध होणे यावरील उपाय :
गरोदरपणात मुळव्याधची समस्या झाली असल्यास त्यासाठी कोणतीही औषधे आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत. आयुर्वेदिक क्रीम असल्यास ती थोडीफार गुदाच्या ठिकाणी लावू शकता. किंवा त्याठिकाणी बर्फ लावणेही उपयुक्त ठरते.
हे सुद्धा वाचा..
गरोदरपणात नियमित पोट साफ होण्यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घ्या.
Read Marathi language article about piles during Pregnancy. Last Medically Reviewed on March 8, 2024 By Dr. Satish Upalkar.