गर्भावस्थेत पोटफुगी, पोटात गॅस होणे व अपचनाची समस्या असल्यास त्यावरील उपाय जाणून घ्या..

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

गर्भावस्थेत अपचन व पोटात गॅस होणे :

गरोदरपणात गॅसेसची समस्या होणे ही अगदी सामान्य बाब आहे. प्रेग्नन्सीतील हार्मोन्समधील बदलांमुळे, पोटात वाढणाऱ्या गर्भाचा दबाव पोट आणि आतड्यावर पडल्यामुळे पचनक्रिया थोडी कमी झालेली असते त्यामुळे गॅसेसची समस्या होत असते.

गरोदरपणात पोटात गॅसेस होऊ नये म्हणून अशी घ्यावी काळजी :

1) योग्य आहार घ्या..
सहज पचनारा हलका आहार घ्या. एकाचवेळी भरपेट जेवण्यापेक्षा दिवसातून 3 ते 4 वेळा थोडेथोडे खावे. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, फळे, गाजर, मनुका, नाचना, कोशिंबीर, मोड आलेली कडधान्ये यासारखे हाय-फायबर्सयुक्त पदार्थ खावेत.

2) अयोग्य आहार टाळा..
बेकरी प्रोडक्ट म्हणजे मैद्याचे पदार्थ, बिस्किटे, केक, मिठाई खाणे टाळा. पचनास जड असणारे पदार्थ, मांसाहार वारंवार खाणे टाळावे. सोडायुक्त कोल्ड्रिंक्स, चहा, कॉफी पिणे टाळावे.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

3) पुरेसे पाणी प्या..
प्रेग्नन्सीमध्ये दिवसभरात पुरेसे म्हणजे साधारण 8 ग्लास पाणी प्यावे. याशिवाय शहाळ्याचे पाणी, लिंबूपाणी यांचाही समावेश करू शकता.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

4) व्यायाम करा..
व्यायाम केल्याने पचनक्रिया वाढण्यास मदत होते. यासाठी गरोदरपणातही हलका व्यायाम करावा. विशेषतः चालण्याचा व्यायाम करावा. सकाळी किंवा संध्याकाळी थोडावेळ बागेत किंवा मोकळ्या हवेत फिरायला जावे. यामुळे पचन व्यवस्थित होऊन गॅसेस व पोटफुगी यासारख्या समस्या दूर होतात.

हे सुद्धा वाचा..

गरोदरपणात पोट साफ होण्यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
Gas and bloating during pregnancy marathi information.

प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पासून ते बाळाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती देणारे उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.