पायाला घाम येणे (Sweaty legs) –
आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित राखण्यासाठी घाम येत असतो. बऱ्याचजणांना पायाला जास्त घाम सुटण्याची समस्या असते. विशेषतः तळपायाला घाम अधिक सुटत असतो. याची विविध कारणे असू शकतात.
पायाला घाम येण्याची कारणे –
उन्हाळ्याचे दिवस, जीन्स किंवा जाडसर पँट वापरणे, पायमोजे व बुट घालणे, जास्त व्यायाम करणे, मानसिक ताण, भीती अशा विविध कारणांनी पायाला घाम येतो. तसेच हाइपरहाइड्रोसिस, डायबेटिस, थायरॉईडची समस्या, लठ्ठपणा अशा त्रासामुळेही पायाला जास्त घाम येतो.
पायाला घाम येणे यावर उपाय –
1) टोमॅटोचा आहारात समावेश करा.
पायाला जास्त घाम येत असल्यास टोमॅटोचा आहारात समावेश करावा. कारण टोमॅटोमुळे घाम कमी करण्यासाठी मदत होते. यासाठी ग्लासभर टोमॅटोचा ज्यूस दररोज प्यावा.
2) तळपायाला लिंबाची फोड चोळावी.
तळपायाला घाम जास्त येत असल्यास तेथे लिंबाची फोड चोळावी. यामुळेही घाम कमी होण्यास मदत होते.
3) बेकिंग सोडा व लिंबू रसाचे मिश्रण लावावे.
एक चमचा बेकिंग सोडा घेऊन त्यात लिंबू रस घालावा. त्यानंतर घाम येणाऱ्या ठिकाणी कापसाच्या बोळ्याने ते मिश्रण लावावे. त्यानंतर अर्ध्या तासाने स्वच्छ आंघोळ करावी.
पायाला जास्त घाम येत असल्यास घ्यायची काळजी –
- पायाला जास्त घाम येत असल्यास पुरेसे पाणी प्यावे. कारण घामावाटे शरीरातील पाणी कमी होत असते. शरीरात पाणी कमी झाल्याने डिहायड्रेशन होऊ शकते.
- यासाठी दिवसभरात 7 ते 8 ग्लास पाणी प्यावे.
- नारळपाणी, रसदार फळे, लिंबूपाणी, कोकम सरबत असे द्रव पदार्थ देखील प्यावे.
- घाम जास्त येत असल्यास सुती व सैलसर कपडे वापरावीत.
- घामामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊन त्वचारोग होण्याचा आधीक धोका असतो. यासाठी घाम जास्त येत असल्यास साबणाचा वापर करून रोजच्यारोज स्वच्छ अंघोळ करावी.
हे सुध्दा वाचा – पायाला गोळे येणे यावरील उपाय जाणून घ्या..
Read Marathi language article about Sweating between legs their Causes, Symptoms, Treatment and Home remedies. Last Medically Reviewed on March 6, 2024 By Dr. Satish Upalkar.