White spots on the skin causes and treatments in Marathi.
त्वचेवरील पांढरे डाग –
काहीवेळा त्वचेवर पांढरे डाग पडल्याचे दिसून येते. त्वचेतील मेलॅनीनची कमतरता, त्वचाविकार, पोषक घटकांची कमतरता अशा अनेक कारणांमुळे त्वचेवर पांढरे डाग येतात. डॉ सतीश उपळकर यांनी त्वचेवरील पांढरे डाग घालवण्याचे उपाय या लेखात सांगितले आहेत.
त्वचेवर पांढरे डाग पडण्याची कारणे –
त्वचेतील मेलॅनीनची कमतरता, ऍलर्जी, त्वचाविकार, पोषक घटकांची कमतरता, पोटातील जंत अशा कारणांनी त्वचेवर पांढरे डाग येतात. तसेच पांढरे कोड ह्या त्वचा विकारात मेलॅनीनची कमतरता झाल्याने त्वचेवर पांढरे डाग येतात.
त्वचेवरील पांढरे डाग जाण्यासाठी घरगुती उपाय –
त्वचेवर कोडाचे पांढरे डाग असल्यास त्या डागांवर पपईचा गर चोळावा. हा उपाय काही दिवस केल्यास त्वचेवरील पांढरे डाग कमी होण्यास मदत होते.
तुळशीच्या पानांच्या रसात थोडा लिंबू रस मिसळून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण दररोज त्वचेवरील पांढऱ्या डागांवर लावावे. पांढरे डाग जाण्यासाठी हा उपाय उपयोगी पडतो.
हळदीमध्ये थोडे मोहरीचे तेल मिसळून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण दिवसातून दोन वेळा त्वचेवरील पांढऱ्या डागांवर 20 मिनिटांसाठी लावावे.
त्वचेवरील पांढऱ्या डागांवर आयुर्वेदिक उटणे लावून हलकी मालिश करावी. त्वचेवर आलेले पांढरे डाग कमी होण्यासाठी हा आयुर्वेदिक उपाय खूप उपयोगी पडतो.
त्वचेवर पांढरे डाग असल्यास घ्यायची काळजी –
- पोटात जंत व कृमी होणार नाहीत याची काळजी घ्या. कारण कृमींमुळेही त्वचेवर पांढरे डाग होत असतात. यासाठी वर्षातून किमान एकदा जंतनाशक औषध आपल्या डॉक्टरांकडून घ्या.
- आंघोळीसाठी केमिकलयुक्त साबण वापरू नका. सौम्य किंवा हर्बल साबण वापरावा.
- मऊ व सुती कपडे वापरा.
- टेरिलीनप्रमाणे घाम न शोषणारी कपडे, पायमोजे वापरू नका.
- झिंक, व्हिटॅमिन-C हे घटक असणारे पदार्थ आहारात समाविष्ट करा.
- अक्रोड, काजू, बदाम, मटण, चिकन यामध्ये झिंक मुबलक असते तर लिंबू, संत्री, मोसंबी, आवळा यात व्हिटॅमिन-C भरपूर प्रमाणात असते. असे पदार्थ खावेत.
पांढरे डाग असल्यास अशी काळजी घेतली पाहिजे.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुध्दा वाचा – पांढरे कोड या त्वचाविकाराची कारणे व उपचार जाणून घ्या..
In this article information about White spots on Skin Causes, Symptoms, Treatment and Home remedies in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar.